Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 28 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजच्या दिवशी तब्येतीकडे लक्ष ठेवा. अस्वस्थता वाढते असं वाटल्यास कुटुंबियांना सांगा. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
3 / 10
आजचा दिवस कोणतंही काम करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. सोपं कामही कठीण वाटू लागेल. पण खचून जाऊ नका. आपलं ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. वाटल्यास वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग करडा राहील.
4 / 10
आज कौटुंबिक कलहामुळे पूर्ण दिवसभर मन अस्वस्थ राहील. शारीरिक थकवा जाणवेल. काल परवापर्यंत जे लोकं आपल्या सोबत होते तेच लोकं पाठ फिरवतील. त्यामुळे वाद होईल असं अजिबात वागू नका. संयम ठेवा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग करडा राहील.
5 / 10
अविवाहित जातकांचा काही स्थळ चालून येतील. निवड करताना योग्य विचारकरून स्थळाची निवड करा. कुटुंबासोबत याबाबत चर्चा करा आणि मगच ठरवा. भागीदारीच्या धंद्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपड करू नका. कारण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेवून जितकं शक्य होईल तितकं काम करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग करडा राहील.
7 / 10
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे मनातून नकारात्मक विचार आणू नका. दिलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
8 / 10
कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, म्युचुअल फंडात फटका बसू शकतो. आळसपणा आज तुमच्या हावी होईल. कौटुंबिक कलहामुळे मन अस्वस्थ होईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
भावकीचा वाद उफाळून येईल. गावाकडच्या जमिनीबाबत कलह विकोपाला जाईल. त्यामुळे कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. बचत करण्यावर जोर द्या. भविष्यात पुंजी कामी येईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग जांभळा राहील.
10 / 10
आजचा दिवस लाभाचा राहील. काही जुन्या अडचणींचा सोक्षमोक्ष लागेल. न्यायायलयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. त्यामुळे जितकी कामं आज आटोपता येतील तितकी करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)