Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस यश मिळवून देणारा आहे. त्यामुळे या सकारात्मक दिवसाचा पुरेपूर फायदा करून घ्या. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल अशीच स्थिती आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
आपल्या अडचणी दुसऱ्यासमोर मांडताना काळजी घ्या. काही लोकं तुम्हाला अडचण समजल्यानंतर त्रास देऊ शकतात. त्यामुळे योग्य व्यक्तीसमोरच आपल्या व्यथा मांडा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल अशी स्थिती आहे. कुटुंबासोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
5 / 10
व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचित मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणतंही पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचला. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांना काही नवीन संधी चालून येतील. एखाद्या बिझनेस सुरु करण्यासाठी पैशांची गरज भासू शकते. त्यामुळे आवाका पाहूनच त्या दिशेने पाऊल टाका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग हिरवा राहील.
7 / 10
आपल्या विचारांवर ठाम राहणं गरजेचं आहे. काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतील. पण त्यासाठी विचारसरणी बदलू नका. नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
8 / 10
आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग आणि व्यायाम करणं सुरु करा. डोकं शांत ठेवून आराम करा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
9 / 10
कामाच्या ठिकाणी पगारवाढ किंवा पदोन्नती होईल अशी स्थिती आहे. वाद होईल असं वागू नका. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. पत्नीसोबत कौटुंबिक कार्यक्रमात वाद होऊ शकतो. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
10 / 10
आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा ग्या. कारण संधी रोज चालून येत नाही. हाती घेतलेलं काम पूर्ण करा. तसेच कोणाचे पैसे देणं बाकी असेल तर तेही देण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)