Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 21 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कामाच्या ठिकामी असलेली स्पर्धा डोकेदुखू ठरेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न करा. शांत राहा आणि दिवसभर आराम करा. आज केलेली बचत भविष्यात कामी येईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
3 / 10
आज दिवस भावनात्मक राहील. छोट्या छोट्या गोष्टींवरून मन उदास होईल. आपल्या मनातील भावना बोलून गैरसमज दूर करा. राग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 17 आणि शुभ रंग हिरवा राहील.
4 / 10
आज उत्साहाने कामाला लागा. कारण सकारात्मक विचार कधी कधी न होणारी कामंही पटकन मार्गी लावतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली क्षमता तपासा. शुभ अंक 41 आणि शुभ रंग जांभळा राहील.
5 / 10
कोणतंही काम मनापासून केलं की पूर्ण होतं. त्यामुळे मन लावून काम पूर्ण करा. कोणतं काम आधी करायचं आहे त्याला प्राधान्य द्या. काही जुन्या आठवणींमुळे मन उदास होईल. शुभ अंक 32 आणि शुभ रंग जांभळा राहील.
6 / 10
आई वडिलांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. काही कारणास्तवर घरात भांडणं होऊ शकता. काही ठिकाणी अकारण पैसा खर्च होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
7 / 10
काही कामं आज चुटकीसरशी पूर्ण होतील. नातेवाईकांची तुम्हाला मदत होईल. काही कामं उत्साहाने पूर्ण कराल. पण आपल्या स्वभावाचा कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, याची काळजी घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.
8 / 10
नाती तुटणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल. भविष्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.शुभ अंक 9 आणि शुभ रंग लाल राहील.
9 / 10
व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. मेहनतीच्या जोरावर आजपर्यंत तुम्ही जे मिळवलं त्याचं फळ आज अनुभवता येईल. लोकं कौतुक करतील त्यामुळे आत्मिक आनंद मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
10 / 10
भावनात्मक होत घेतलेला निर्णय कधी चांगलाच महागात पडतो. तुम्ही आध्यात्मिक दृष्टीने विचार करा. शत्रूपक्ष तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे जास्त लक्ष न देता ध्येयाकडे वाटचाल करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)