गड-किल्ला भटकंतीचे धाडस चौघे मित्रांनी केले, चौघांपैकी एक भरकटला अन् विसापूर गडावर काय झाले
visapur fort : पर्यटनाची आणि गड, किल्ल्यांवर भटकंतीचा आवड असली तरी त्या माहिती असणे गरजेचे आहे. मावळ तालुक्यातील विसापूर गडावर एका पर्यटकावर बिकट प्रसंग आला. परंतु ग्रामस्थ आणि शिवदुर्ग रेस्कू टीममुळे तो वाचला.
1 / 5
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या आणि चढाईसाठी अवघड समजला जाणाऱ्या विसापूर किल्ल्यावर भटकंती करण्यासाठी चार पर्यटक पुण्यावरून आले होते. मात्र यापैकी एक पर्यटक वाट चुकला.
2 / 5
तिघं मित्रांची आपल्या चौथ्या मित्राचा शोध घेताना चांगलीच दमछाक झाली. अनेक प्रयत्न केल्यानंतर मित्र सापडला नसल्यामुळे त्यांनी लोणावळा शिवदुर्ग रेस्कु टीम आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली.
3 / 5
टीमने तांत्रिक बाबी अन् मोबाईल नेटवर्कने तपासणी केली. त्यावेळी वाट चुकलेला त्यांचा चौथा मित्र दरीत पडलेला आढळून आला. तो पर्यटक दरीत पडल्यामुळे जखमी झाला होता. त्याला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान रेस्कू टीमसमोर होते.
4 / 5
सतत पडणाऱ्या पावसाने, रस्ता निसरडा झाला होता. धुक्याची अडचण आणि जखमी पर्यटकाचा हात फॅक्चर झाला होता. त्याला अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे स्केडच्या स्ट्रेचरमधून त्याला सुरक्षित बाहेर आणले.
5 / 5
सांगलीचे असलेले चार पर्यटक पुण्यात कामानिमित्त आले होते. रविवार सुट्टीचे अवचित साधत त्यांनी विसापूर गडावर पर्यटनाचा निर्णय घेतला. परंतु या गडाबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. यामुळे ही घटना घडली.