Marathi News Photo gallery Prime Minister Narendra Modi on a visit to Japan; Saying 'Bharat Maa Ka Sher', Indians did it. Prime Minister Narendra Modi on his visit to Japan; Saying 'Bharat Maa Ka Sher', Indians in Japan chanted Modi's name
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर ; ‘भारत माँ का शेर’ म्हणत जपानमध्ये मोदींच्या नावाचा जयघोष
पंतप्रधान मोदींनी भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील NEC च्या भूमिकेचे कौतुक केले आणि भारतातील नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संधींवर चर्चा केली.
1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते 23 ते 24 मे दरम्यान दौऱ्यावर आले आहेत. येथे पीएम मोदी क्वाड समिटमध्येही सहभागी होणार आहेत.
2 / 10
जपानमधील जवळपास 40 तासांच्या मुक्कामात पंतप्रधान मोदी 23 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत, ज्यात तीन जागतिक नेत्यांच्या भेटींचा समावेश आहे.
3 / 10
24 मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या क्वाड समिटमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांसोबत सहभागी होणार आहेत
4 / 10
.या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी 36 हून अधिक जपानी सीईओ आणि शेकडो भारतीय प्रवासी सदस्यांशी संवाद साधणार आहेत.
5 / 10
टोकियोमध्ये असलेल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. 'जपानमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा निश्चितच आमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्यांच्या येण्याने सर्वत्र आमचा अभिमान वाढला आहे.
6 / 10
भारतीय समुदायाच्या लोकांनीही पंतप्रधान मोदींसाठी 'भारत माँ का शेर' अशी घोषणाही त्यावेळी देण्यात आली.
7 / 10
23-24 मे रोजी जपानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते टोकियो, जपानला जात आहेत.
8 / 10
या दौऱ्यामध्ये लहान मुलांनीही मोदींच्या सोबत संवाद साधत आटोग्राफ तसेच सेल्फीही घेतले. यामध्ये सहभागी झालेली पाचवीची विद्यार्थिनी विझुकी म्हणाली- मला जास्त हिंदी बोलता येत नाही, पण समजते. पंतप्रधानांनी माझा संदेश वाचला आणि मला त्यांचा ऑटोग्राफही मिळाला, मी आनंदी आहे.
9 / 10
मार्चमध्ये, त्यांना 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान किशिदा यांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळाला. त्यांच्या टोकियो भेटीदरम्यान, ते दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने संवाद सुरू ठेवण्यास उत्सुक आहेत.
10 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोकियोमधील NEC कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो आंदो यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की पंतप्रधान मोदींनी भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील NEC च्या भूमिकेचे कौतुक केले आणि भारतातील नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संधींवर चर्चा केली.