भारताचं 322 सदस्यांच पथक बर्मिंघम मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सहभागी होणार आहे. काही खेळाडूंनी मागच्या काही काळात आपली ओळख निर्माण केली आहे. यंदा पदकासाठी ते दावेदार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, त्यांचं नाव कदाचितच तुम्हाला माहित असेल. पण यावेळी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मेडलसाठी ते मजबूत दावेदार आहेत.
वेटलिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू एक मोठं नाव आहे. तुम्ही कदाचित अचिंताच नाव ऐकल असेल. यंदा मेडल जिंकण्यासाठी हा खेळाडू एक प्रमुख दावेदार आहे. अचिंता 73 किलो वजनीगटात खेळणार आहे. मागच्यावर्षी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्याने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. यावर्षी झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल जिंकलं. (SAI)
बनारस मध्ये राहणारी पूर्णिमा पांडे वेट लिफ्टिंगच्या 86 किलो वजनी गटात खेळणार आहे. मागच्यावर्षभरात 8 वेळा तिने राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्येही तिने गोल्ड मेडल जिंकलं होतं. (SAI)
बॉक्सर संजीत कुमार 92 किलो वजनी गटात खेळणार आहे. त्याने दुबईत झालेल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. संजीतने 2019 साली रशियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली होती. खांद्याच्या दुखापतीमुळे तो ऑलिंपिक क्वालीफायर मध्ये जाऊ शकला नाही.
जेरेमी लालरिनुंगाही वेटलिफ्टिंग मध्ये पदक विजेती कामगिरी करु शकतो. 2018 युथ ऑलिम्पिक्स मध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं होतं. अशी कामगिरी करणारा तो देशातील पहिला एथलीट होता. जेरेमी 67 किलो वजनी गटात सहभागी होईल. मागच्यावर्षाच्या अखेरीस त्याने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलं होतं.