Marathi News Photo gallery Cwg 2022 day 3 schedule india vs pakistan cricket match hockey india vs ghana weightlifing jeremy lalrinnunga match
CWG 2022 Day 3, Schedule: IND vs PAK सामन्यावर सगळ्यांची नजर, आजही पदकासाठी वेटलिफ्टर्सवर मदार
CWG 2022 Day 3, Schedule: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज तिसरा दिवस आहे. सगळ्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान मध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावर असेल. आजही वेटलिफ्टर्सकडून पदकांची अपेक्षा आहे.
1 / 5
कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज तिसरा दिवस आहे. सगळ्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान मध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावर असेल. आजही वेटलिफ्टर्सकडून पदकांची अपेक्षा आहे. टेबल टेनिस, हॉकी मध्ये भारतीय खेळाडू सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. 31 जुलैला वेटलिफ्टिंग मध्ये बिंदियारानी देवी, यूथ ऑलिम्पिक गेम्सचा गोल्ड मेडलिस्ट जेरेमी लालरिननुंगा, अचिंता शुलि भारताच्या पदकांच्या संख्येमध्ये भर घालू शकतात. PTI
2 / 5
हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना यांच्या भारतीय क्रिकेट संघाला कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 3 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारतासमोर पाकिस्तानाचं आव्हान आहे. सगळ्यांच्या नजरा या भारत-पाकिस्तान सामन्यावर असतील. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरु होईल. PTI
3 / 5
भारतीय पुरुष हॉकी संघ घाना विरुद्धच्या सामन्याने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आपल्या अभियानाची सुरुवात करेल. भारतीय संघ पूल बी मध्ये आहे. संध्याकाळी 4 वाजता हा सामना सुरु होईल. AFP
4 / 5
टेबल टेनिस मध्ये दुपारी 2 वाजता पुरुष संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. संध्याकाळी 4 ते 9 दरम्यान महिला सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. मात्र त्याआधी भारतीय संघाचा सामना क्वार्टर फायनलमध्ये मलेशिया विरुद्ध होईल. PTI
5 / 5
स्विमिंग मध्ये पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लायला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. भारताकडून प्रकाश आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये श्रीहरी नटराज उतरतील. जिमनॅस्टिक मध्ये योगेश्वर सिंह दुपारी 1.30 वाजता उतरेल. बॅडमिंटनच्या मिश्र क्वार्टर फायनलचा सामना रात्री 10 वाजता खेळवला जाईल. JEREMY LALRINNUNGA instagram