अभिनेत्री उर्वशी रौतेलाने यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली. यावेळच्या तिच्या लुकची जोरदार चर्चा झाली.
उर्वशी रौतेला हिने पिंक कलरचा डिझायनर गाऊन घातला होता. तिच्या या ड्रेसची तर चर्चा झालीच. शिवाय तिने घातलेल्या नेकलेसनेही अनेकांचं लक्ष वेधलं.
उर्वशीने मगरीच्या आकाराचा नेकलेस घातला होता. तिचा नेकलेस अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
उर्वशीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केली आहे. एकाने तर तिच्या नेकलेसवर बोलताना थेट क्रिकेटपटू ऋषभ पंतचा संदर्भ दिला आहे. आता लक्षात आलं की ऋषभ रात्रीबेरात्री का घाबरतो, असं एका नेटकऱ्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मागच्या वर्षीही उर्वशीने कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला होता.