नवी दिल्ली – देशात भटक्या कुत्र्यांची दहशत झपाट्याने वाढते आहे. गेल्या साडे तीन वर्षांत भटकी कुत्री आणि इतर प्राण्यांनी माणसांना किंवा इतर प्राण्यांना चावा घेतल्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. दररोज सरासरी अशा चावा घेतल्याच्या सरासरी 12, 256 घटना दाखल केल्या जात आहेत. हा आकडा धक्कादायक असाच म्हणायला हवा. यातील सर्वाधिक प्रकरणे ही महाराष्ट्र, उ. प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, प. बंगाल आणि आंध्रप्रदेशात दाखल करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार ए एम आरिफ यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी ही माहिती दिली आहे.
आयडीएसपी आणि आयएचआयपीच्या माहितीनुसार,
या आकडेवीरीत महाराष्ट्राचाही क्रमांक वरचा आहे. आपल्या राज्यातही चावा घेतल्याची अनेक प्रकरणे होत आहेत. गेल्या साडे तीन वर्षांच्या विचार केल्यास
गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि प्राण्यांनी चावा घेतल्याच्या देशभरात 1कोटी 60 लाख 62 हजार 815 प्रकरणे समोर आली आहेत. या सगळ्याची दिवसाची सरासरी विचारात घेतली तर ती साधारणपणे 12 हजार 256 इतकी मोठी आहे.
डॉग बाईटसारख्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारनेही प्रयत्न सुरु केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. देशात राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. नियमांनुसार अशा भटक्या प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाला आहे. याबाबत सरकारने पशु जन्म नियंत्रण नियम केला असून त्यात 2010 साली दुरुस्ती करण्यात आली आहे. मनुष्य आणि पशू यांच्यातील वाद कमी करण्यासाठी सामुदायिक प्राण्यांची दत्तक योजना सुरु करण्यावर भर असल्याचेही सांगण्यात आले आहे.