Maruti Car Scam: भंगारवाल्याने 85 लाखांत खरेदी केल्या पुरातल्या लक्झरी 87 कार, नंतर कोट्यवधींना विकल्या

| Updated on: Aug 19, 2022 | 5:41 PM

2019 साली पटियालात पूर आला होता. ज्यात राजपुरा रोडवर असलेल्या एटलियर ऑटोमोबाईल्सच्या 87 कार्सना या पुराचा फटका बसला होता. या सगळ्या कार मारुतीच्या होत्या. पुरात या गाड्या काही दिवस तशाच राहिल्याने शोरुमने या कार भंगाराच्या भावात विकल्या होत्या.

Maruti Car Scam: भंगारवाल्याने 85 लाखांत खरेदी केल्या पुरातल्या लक्झरी 87 कार, नंतर कोट्यवधींना विकल्या
मारुती कार घोटाळा
Image Credit source: ANI
Follow us on

चंदीगड – मारुती कार जास्त दराने विकणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुराच्या पाण्यात खराब झालेल्या कार एका भंगारवाल्याने (scrap delar)खरेदी केल्या होत्या. त्यानंतर या कार खोट्या कागदपत्रांच्या आधाराने आरटीओत (RTO office)नव्याने रजिस्टर करण्यात आल्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पंजाब पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलि्सांनी 40 कार जप्त केल्या आहेत. यात मारुती सुझिकीच्या (Maruti)8 सियाज, 2 स्विफ्ट, 4 स्विफ्ट डिझायर, 4 बलेनो, 3 ब्रेझा, 2 सॅलेरियो आणि 10 अल्टो कारचा समावेश आहे. हा भंगारवाला आणि त्याच्या 4 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 3 जणांना अटकही करण्यात आली आहे.

पटियालाच्या कार एजन्सीत आला होता पूर

2019 साली पटियालात पूर आला होता. ज्यात राजपुरा रोडवर असलेल्या एटलियर ऑटोमोबाईल्सच्या 87 कार्सना या पुराचा फटका बसला होता. या सगळ्या कार मारुतीच्या होत्या. पुरात या गाड्या काही दिवस तशाच राहिल्याने शोरुमने या कार भंगाराच्या भावात विकल्या होत्या.

85  लाखांत खरेदी केल्या होत्या 87 कार

शोरुमने या कार भंगारात काढायचे ठरवल्यानंतर पोलीस आणि वाहतूक विभागाला संपर्क केला नव्हता. त्यांच्या पातळीवरच त्यांनी या कार मानसा येथील पुनित ट्रेडिंग कंपनीचा मालक पुनित गोयल याला विकल्या होत्या. 87 कार्स केवळ 85  लाखांना विकण्यात आल्या होत्या.

चेसी नंबर नष्ट केले, मात्र आरसी बनवून विकल्या कार

या कंपनीने या कार जेव्हा या भंगारवाल्याला विकल्या होत्या, त्यावेळी कारवीरल असलेले चेसी नंबर नष्ट करण्यात आले होते. त्याचे कारण या कारचा पुढे उपयोग होऊ नये, हा उद्देश होता. त्यानंतरही पुनित गोयल आणि त्याच्या साथीदारांनी पंजाब आणि इतर राज्यांतील आरटीओ ऑफिसांतून या कारची नोंदणी करवून घेतली. या कार पुढे कोट्यवधींना विकण्यात आल्या.

भंगारवाला फरार, त्याच्या वडिलांना केली अटक

या प्रकरणात भंगारवाला पुनित गोयल, त्याचे वडील राजपाल सिंह, कार डिलर आणि मास्टरमाईंड जसप्रीत सिंह तसेच आरटीओ एजेंट नवीन कुमार यांचा सहभाग होता. पुनित गोयल हा फरार असून इतर तिघांना आता अटक करण्यात आलेली आहे.