नवी दिल्ली : काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) RSS चे प्रचारक होते. अवघ्या 20 वर्षांच्या मोदी यांनी संपूर्ण देश पाहिला होता. देशाच्या विविध संस्कृती आणि परंपरा त्यांनी जवळून पाहिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे ते नियमीत सदस्य होते. त्यांचा स्वभाव, झोकून काम करण्याचे उर्मी, संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी लोकांना त्यांच्याकडे आकृष्ट केले. 1973 मध्ये संघाने त्यांच्यावर एका मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सोपवली. सिद्धपुर (Sidhapur) मध्ये पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रम यशस्वी करुन दाखविला. याच काळात संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संबंध आला. मुख्यमंत्री मोदी आणि पंतप्रधान मोदी पर्यंतचा (PM Modi) हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आणि कष्ट होते. त्यामुळेच इतिहासातील या घटनांना यासाठी उजाळा देण्यात आला.
1999 साली देशात पहिल्यांदा भाजपचे सरकार आले. 5 वर्षे सरकार सत्तेत होते. पण 2004 मध्ये काँग्रेसने भाजपला पुन्हा सत्तेतून बाहेर केले. त्यावेळी संपूर्ण देशात भाजप नव्हते. केवळ उत्तर आणि उत्तर मध्ये भारतातील राज्य, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातच भाजपचा प्रभाव होता. उत्तर पूर्व, दक्षिण भारतात भाजपला काहीच जनाधार नव्हता. एवढंच काय पक्षाचा एकही आमदार आणि खासदार या प्रदेशातून निवडून येत नव्हता. 2004 ते 2014 या 10 वर्षांत देशात काँग्रेसची सत्ता होती. तर मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले होते. मुख्यमंत्री पदी येताच मोदींनी यशाची एक एक पायरी चढली.
2013 शेवटी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले. हा पक्षाच्या स्तरावर मोठा निर्णय होता. जनतेनेही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारले होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपने उत्तर भारतात जोरदार प्रदर्शन केले आणि पहिल्यांदा पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एका नंतर एक राज्यात कमळ फुलवले. पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या जोडीने आसाम, मणिपूर, अरुणाचल आणि त्रिपुरा या राज्यात सत्ता काबीज केली. या राज्यात यापूर्वी कधीच भाजपचा मुख्यमंत्री नव्हता.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवावी हा मुद्दा समोर आला. त्यावेळी राजकीय पंडित, विश्लेषक, तज्ज्ञांनी अंदाज लावला की, मोदी हे गुजरातमधूनच निवडणूक लढवतील. पण हा अंदाज साफ चूकला. भाजप आणि आरएसएस यांनी निर्णय घेतला की, मोदींनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी. उत्तर प्रदेशातून लोकसभेसाठी 80 उमेदवार निवडून जातात. यातील कोणत्या मतदारसंघातून मोदींनी निवडणूक लढवावी असा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी मोदींसाठी वाराणसी हा मतदारसंघ कायम करण्यात आला. या घोषणेनंतर हे स्पष्ट झाले की, देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपला अजून विस्तार करायचा आहे. वाराणसी हे शहर बिहार लगत आहे. बिहारची संस्कृतीची झलक तुम्हाला वाराणसीत ठळकपणे दिसून येईल. पीएम मोदींनी वाराणसीतून ऐतिहासिक विजय मिळवला. ‘मुझे माँ गंगा ने बुलाया है’, या त्यांच्या वाक्याने भावनिक लहर संपूर्ण देशभर पसरली. मोदींची जादू देशभर चालली. 2014 नंतर 2018 पर्यंत भाजपची विजयी पतका फडकली. 21 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली.