PM Modi speech : नरेंद्र मोदी यांनी ‘या’ पाच मुद्यांवरुन काँग्रेसला घेरले

| Updated on: Aug 10, 2023 | 6:36 PM

Narendra modi lok sabha LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी काँग्रेसला घेरले. काँग्रेस सरकारच्या काळात देशातील परिस्थिती अन् भाजपच्या काळात देशातील परिस्थिती, यावर भाष्य केले.

PM Modi speech : नरेंद्र मोदी यांनी या पाच मुद्यांवरुन काँग्रेसला घेरले
PM Narendra modi lok sabha speech
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावला उत्तर देताना काँग्रेस पक्षाला लक्ष केले. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो, अशी सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाने केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी विरोधकांना विशेषता काँग्रेसला घेरले. लोकसभेतील काँग्रेसने नेते अधीर रंजन चौधरी यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यावरुन त्यांनी काँग्रेसला लक्ष केले. आतापर्यंत अविश्वास प्रस्तावाची सुरुवात लोकसभेतील विरोधी पक्षातील नेत्यांकडूनच झाली, त्यासंदर्भातील उदाहरणे त्यांनी दिली.

अधीर रंजन यांना संधी नाहीच…

मोदी यांनी सांगितले की, १९९९ मध्ये वाजपेयी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आला. त्यावेळी त्याचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. २००३ मध्ये वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळी अविश्वास प्रस्तावाचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी केले. २०१८ मध्ये मल्लिकार्जुन खडगे यांनीच सुरुवात केली. परंतु आता २०२३ मध्ये अधीरजी यांना संधी मिळाली नाही. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करत आहेत. त्यांना कधी निवडणुकीच्या नावाने अस्थायी रुपाने फ्लोअर लिस्टमधून हटवलं जातं. यामुळे आम्ही अधीर बाबू यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो, असा चिमटे नरेंद्र मोदी यांनी लगावला.

२०२८ मध्ये काय होणार

देशाची अर्थव्यवस्था १९९१ मध्ये रसातळाला गेली होती. काँग्रेसच्या काळात देश कंगाल झाला. त्यानंतर अथक प्रयत्नाने देश आज नवीन उंचीवर जात आहे. आपली अर्थव्यवस्था आता पहिल्या पाचमध्ये आली आहे. यापुढे २०२८ मध्ये जेव्हा काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाईल तेव्हा देशाची अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये असणार आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसवर जनतेचा अविश्वास

देशातील जनतेचा काँग्रेसवर अविश्वास वाढला आहे. काँग्रेस आपल्या अहंकारमध्ये आहे. यामुळे त्यांना जमीन दिसत नाही. तामिळनाडूमध्ये १९६२ मध्ये काँग्रेसचा शेवटचा विजय झाला होता. १९७२ मध्ये शेवटचा विजय पश्चिम बंगालमध्ये झाला होता. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात १९८५ मध्ये शेवटचा विजय मिळाला होता. आडिशामध्ये २८ वर्षांपासून काँग्रेसवर जनता अविश्वास दाखवत आहे. नागालँडमध्ये १९८८ नंतर काँग्रेसला विजय मिळवता आला नाही.

काँग्रेसला स्वत:चा विचार नाहीच

काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व ठिकाणी आपले नावे दिली. सरकारी योजना त्यांच्या नावावर चालवली. रस्ते, रुग्णालये,  शैक्षणिक संस्थांना त्यांची नावे दिली. परंतु काम दिसले नाही. त्या योजनांमध्ये हजारो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. काँग्रेसची एकही वस्तू आपला नाही. काँग्रेसचा निवडणूक चिन्हसुद्धा त्यांचा नाही. ते सुद्धा दुसरीकडून घेतले आहे. काँग्रेसचे विचारसुद्धा त्यांचे नाही. गांधी नावसुद्धा त्यांचे नाही. ते नावही चोरले. काँग्रेस पक्षाचे संस्थापक विदेशी होते.

काँग्रेसमध्ये परिवार वाद

काँग्रेसमध्ये परिवार वाद आहे. या परिवारवादाला महात्मा गांधी यांनी विरोध केला. सरदार पटेल यांनीही परिवार वादाला विरोध केला. परंतु काँग्रेसने आपल्या बेटा, बेटीसाठीच काम केले. काँग्रेसने महान नेत्यांचे अधिकार नेहमी दाबवून ठेवले. ज्यांनी दारबादवादला जोडले नाही, अशा कितीतरी महान नेत्यांना काँग्रेसने मोठे होऊ दिले नाही.