नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांच्याकडे अजमेर शरीफ दर्गा ( Ajmer Sharif Dargah) येथे चढविण्यासाठी चादर सुपूर्द केली. यंदा अजमेर शरीफ दर्गा येथे ख्वाजा मोहनुद्दीन चिश्ती यांचा 810 वा उरुस पार पडत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे देण्यात आलेली चादर अजमेर शरीफ दर्गा येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती येथील उरुसानिमित्त चादर सादर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत एक फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे. राजस्थानातील अजमेर येथे सुफी संतांचा दर्गा आहे. अजमेर शरीफ दर्गा येथे जात धर्म आणि इतर गोष्टी विसरुन मोठ्या संख्येनं लोक चादर चढवण्यासाठी येतात.
Presented the Chadar which shall be offered at the Ajmer Sharif Dargah on the Urs of Khwaja Moinuddin Chishti. pic.twitter.com/SJhObXNhRA
— Narendra Modi (@narendramodi) February 2, 2022
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची ओळख ख्वाजा गरीब नवाझ अशी देखील आहेत. ते सुफी संत होते. मोहम्मद पैगंबरांचे ते वंशज म्हणून ओळखले जातात. सध्या दक्षिण अफगाणिस्तान आणि पूर्व इराणच्या भागात असणाऱ्या सिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सिस्तानमधून प्रवास करत ते लाहोर मार्गे दिल्ली येथे आले होते. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरमध्ये स्थायिक झाले. राजस्थानधील अजमेर येथील अजमेर शरीफ दर्गा हे एक पवित्र इस्लामिक स्थळ मानलं जातं. जगभरातील मुस्लीम नागरिक अजमेरला येऊन प्रार्थना करतात. मुस्लीम नागरिकांशिवाय इतर धर्मीय बांधव देखील दरवर्षी अजमेर शरीफ दर्गा येथे भेट देतात.
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना भारतात सुफी परंपरेत चिस्ती घराण्याचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी प्रार्थनेमध्ये संगीताचा समावेश केला होता. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या स्मृतिदिनानिमित्त उरुस आयोजित केला जातो.
इतर बातम्या:
Narendra Modi presented Chadar to Ajmer Sharif Dargah for Urs of Khwaja Moinuddin Chishti