नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुकीचा निकाला आता लागला असून भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये जागा राखली आहे. मात्र कसबा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून यामधील नागालँडमधील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी मोठा विजय मिळवला आहे. नागालँड भाजपचे अध्यक्ष तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी अलोंगटाकी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
जनता दल युनायटेडच्या जे लानू लोंगचर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तेमजेन इम्ना अलॉन्ग यांना 59% मते तर म यांना 41% मिळाली आहेत. तेमजेन इम्ना अलॉन्ग यांना एकूण 9172 तर तेमजेन इम्ना अलॉन्ग यांना 5468 इतकी मते मिळाली आहेत. 3704 इतक्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरू म्हणणाऱ्या तेमजेन इम्ना अलॉन्ग कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर काही दिवसांमागे त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या लहान डोळ्यांबाबत बोलले होते. लहान डोळे असले की त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डोळ्यात कचरा जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या कार्यक्रमात जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही झोपलात तर कोणालाही समजणार नाही की तुम्ही झोपलेले आहात. तेमजेन इम्ना अलॉन्ग यांचा व्हिडीओ देशभर चांगलाच गाजला होता.
नागालँडमधील प्रचार सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. सभेमध्ये संबोधित करताना तेमजेन यांचं कौतुक केलं होतं. संपूर्ण देश हा तेमजेन यांना ओळखतो. सोशल मीडियावरही ते चांगलेच फेमस झालेत. मीसुद्धा त्यांना अनेकवेळा सोशल मीडियावर पाहत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
गुरुजी ने बोल दिया ।
बस, हम तो धन्य हो गए ! ??Guruji ne bol diya! Bas Hum to Dhanya ho gaye!???
@narendramodi pic.twitter.com/sJauW6Xw7V
— Temjen Imna Along (@AlongImna) February 24, 2023
दरम्यान, मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झालं होत. त्रिपुरा राज्यात 16 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. आज या तिन्ही राज्यांची मतमोजणी चालू आहे.