INS Vikrant: 262 मीटर लांब, 15 मजले उंच आणि 45 हजार टन वजन, असा आहे समुद्रातला ‘बाहुबली’

| Updated on: Sep 02, 2022 | 10:11 AM

मेड इन इंडिया मोहिमेअंतर्गत विकसित केलेला आयएनएस विक्रांत हा भारतासाठी मैलाचा दगड आहे. ही युद्धनौका म्हणजे समुद्रातला बाहुबली आहे. 20,000 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही युद्धनौका 53 एकरांवर पसरलेली असून ती 15 मजली इमारतीइतकी उंच आहे.

INS Vikrant: 262 मीटर लांब, 15 मजले उंच आणि 45 हजार टन वजन, असा आहे समुद्रातला बाहुबली
आयएनएस विक्रांत युद्धनौका
Image Credit source: Indian Navy
Follow us on

स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांत (INS Vikrant) आज 2 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाच्या (Indian Neavy) सेवेत सामील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) या कार्यक्रमात सहभागी होणार असून आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाकडे सोपवणार आहेत. नवीन INS विक्रांत ही भारतात बनवलेली पहिली विमानवाहू युद्धनौका (battleship) आहे. 40 हजार टन विमानवाहू युद्धनौका बनविण्यास सक्षम असलेल्या जगातील 6 देशांच्या मोठ्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. मेड इन इंडिया मोहिमेअंतर्गत विकसित केलेला आयएनएस विक्रांत हा भारतासाठी मैलाचा दगड आहे. ही युद्धनौका म्हणजे समुद्रातला बाहुबली आहे. 20,000 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही युद्धनौका 53 एकरांवर पसरलेली असून ती 15 मजली इमारतीइतकी उंच आहे.

काय आहे वैशिष्ट्य?

या युद्धनौकेमुळे सुमारे 2000 लोकांना रोजगार मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावर 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवू शकतात. आणि त्यात 2300 केबिन आहेत. INS विक्रांतची लांबी 262 मीटर आहे आणि जहाजाचे वजन सुमारे 45000 टन आहे. या जहाजाची उंची सुमारे 59 मीटर म्हणजेच 15 मजली इमारतीइतकी आहे आणि रुंदी 62 मीटर इतकी आहे.

INS विक्रांत युद्धनौकेवर 88 मेगावॅट क्षमतेच्या चार गॅस टर्बाइन बसवण्यात आल्या आहेत आणि तिचा कमाल वेग 28  नॉट्स इतका आहे. विक्रांतने गेल्या वर्षी 21 ऑगस्टपासून सागरी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. INS विक्रांतमध्ये 76% स्वदेशी घटक आहेत आणि या युद्धनौकेमध्ये मिग-29 लढाऊ विमाने, कामोव-31, MH-60R व्यतिरिक्त स्वदेशी बनावटीची प्रगत प्रकारची हलकी हेलिकॉप्टर्स (ALH) आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) समाविष्ट आहेत.

हे सुद्धा वाचा

कमी जागेत टेक ऑफ आणि लँडिंग शक्य

कमी क्षेत्रात विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग करता यावे यासाठी आयएनएस विक्रांतची खास रचना करण्यात आली आहे. या युद्धनौकेचा पुढच्या भागात चढाव आहे, ज्याला STOBAR (शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड लँडिंग) डिझाइन म्हणतात आणि याचा फायदा म्हणजे विमान कमी जागेत सहजपणे टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते.

युद्धजन्य परिस्थितीसाठी अत्याधुनिक शास्त्रांनी सज्ज

आयएनएस विक्रांत हा इतका मोठा आहे की, त्याला युद्धादरम्यान लपविणे शक्य नाही. त्यामुळे शत्रूंचा सामना करता यावा यासाठी त्यात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. INS विक्रांतमध्ये 32 मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असतील. ती AK-630 रोटरी तोफेने सुसज्ज असेल. याशिवाय, भारतीय अँटी मिसाइल नेव्हल डेकोय सिस्टमने सुसज्ज असेल, जे लेझर गाईडेड जहाजाकडे येणाऱ्या शत्रूंच्या क्षेपणास्त्राचे लक्ष भरकटवते.