नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : देशातीस सर्वात अवघड मानली जाणारी युपीएससीची ( UPSC ) परीक्षा देताना अनेक जणांना खूप तयारी करावी लागते. आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी अनेक विद्यार्थी अभ्यास करीत असतात. त्यातील मोजकेच विद्यार्थी युपीएससी पास होऊन आयएएस अधिकारी बनण्यात यशस्वी होतात. येथे आपण आयएएस ( IAS ) ऑफीसर रुक्मिणी रियार यांची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत. ज्यांनी सेल्फ स्टडी करून पहिल्याच प्रयत्नात दुसरा रॅंक मिळविला आहे.
शाळेत असताना रुक्मिणी रियार अभ्यासात फारशा हुशार नव्हत्या त्या सहावी असताना नापास झाल्या होत्या. रुक्मिणी यांनी आपले शालेय शिक्षण गुरुदासपुर येथून पूर्ण केली. त्यानंतर इयत्ता चौथीत डलहौसीच्या सेक्रेड हेरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी अमृतसरच्या गुरु नानक देव युनिव्हर्सिटीतून सोशल सायन्समध्ये ग्रॅज्यूएटची डीग्री घेतली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटमधून सोशल सायन्स मध्ये मास्टर डीग्री पूर्ण केली.
मुंबईतून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ( TISS ) रुक्मिणी यांनी मास्टर डीग्री घेतली त्यानंतर म्हैसूरच्या अशोदा आणि मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळ सारख्या एनजीओतून इंटर्नशिप केली. त्यावेळी त्यांनी सिव्हील सेवेबद्दल आवड निर्माण झाली, मग त्यांनी युपीएससीला बसण्याचा निर्णय घेतला. साल 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास करीत ऑल इंडीया रॅंक 2 मिळविला. कोणत्याही कोचिंगविना सेल्फ स्टडी करीत त्यांनी हे यश मिळविले. त्यांनी 6वी ते 12 वी पर्यंत एनसीईआरटीच्या पुस्तकांआधारेच अभ्यास केला आणि नियमित वृत्तपत्रे वाचत राहील्याने त्यांना हे यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.