अहमदाबाद – गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Gujrat assembly election)भाजपा पूर्णपणे एक्शन मोडवर आलेली आहे. निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्याचा पॅटर्न (Changing CM pattern)गुजरात, उत्तराखंड आणि कर्नाटकात याधाही पाहयला मिळालेला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या १५ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन विजय रुपाणी यांची उलचबांगडी करण्यात आली. विजय रुपाणी यांच्याआधी उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याऐवजी तीरथसिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आता मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांना (cabinet ministers removed)हटवण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे. गुजरात सरकारमधील दोन बड्या मंत्र्यांची सरकारने काढून घेतली आहेत. मुख्यमंत्र्यानंतर आता मंत्र्यांची बारी आली आहे, असे सांगण्यात येते आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अचानकपणे निर्णय घेत, शनिवारी महसूलमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांची तर रस्ते आणि इमारतमंत्री पूर्णेश मोदी यांना या मंत्रिपदांवरुन हटवले आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजापाने स्पष्ट केले आहे की, दोन्ही मंत्र्यांची खाती तूर्तास मुख्यमंत्र्यांकडेच असणार आहेत. राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून एक मंत्रीपद काढून घेण्यात आले असले तरी त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, विधी आणि न्याय, विधी आणि संसदीय कार्य ही खाती असणार आहेत. तर पूर्णेश मोदी यांच्याकडे परिवहन, पर्यटन मंत्रीपद कायम राहणार आहे.
या दोन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते आहे. याचा फटका भाजपाला विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला असता. गेले अनेक वर्षांपासून राज्यात भाजपाचे सरकार असल्याचे यावेळी एन्टी इक्मबन्सीचा फटकाही भाजपाला बसण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेससोबतच आम आदमी पार्टीही यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्ये उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आपले प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकत असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत गुजरात हातातून जाऊ देण्याची भाजपाची तयारी नसल्याचे सांगण्यात येते आहे.
तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे. त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच उद्योग, वन आणि पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री जगदीश पांचाल यांच्याकडे रस्ते आणि इमारत विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्यात भाजपाकडून ढिलाई होत नाही. आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी यांच्यासोबत असेच घडले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपद सोडले होते. त्यांच्या पद सोडण्याचे कोणतेही ठोस कारण अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. रुपाणी यांनी सांगितले होते की हा भाजपाच्य परंपरेचा भाग आहे. अशा पद्धतीने पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. उत्तराखंडमध्येही त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याबाबत हेच करण्यात आले होते. तर कर्नाटकातही निवडणुकांपूर्वी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविले होते.