Chandrayaan-3 Update | चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडरने पहिले निरीक्षण पाठवले, काय माहिती दिली पाहा

| Updated on: Aug 27, 2023 | 6:02 PM

चंद्रयान-3 बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग केल्यानंतर पहिले निरीक्षण नोंदवले आहे. त्याचा काय फायदा होणार...

Chandrayaan-3 Update |  चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडरने पहिले निरीक्षण पाठवले, काय माहिती दिली पाहा
​Chandrayaan 3
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग करून इतिहास घडविला आहे. आता विक्रम लॅंडर आणि रोव्हर संपूर्ण तयारीने जोमाने कामाला लागले आहेत. विक्रम लॅंडरमधील चास्टे ( ChaSTE ) पेलोडने चंद्राच्या तापमाना संदर्भातील पहिले ऑब्जर्वेशन इस्रोला पाठविले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चास्टे म्हणजे चंद्र सरफेस थर्मोफिजिकल एक्सपिरिमेंटनूसार चंद्राच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या भागात तापमानात फरक असल्याचे सांगितले आहे.

काय निरीक्षण समोर आले

चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राचा एक दिवस ( पृथ्वीचे 14 दिवस ) तेथे विविध प्रयोग करणार आहेत. चंद्राच्या विक्रम लॅंडरमधून रोव्हरने काल बाहेर पडून सुमारे 26 फुट अंतर हळूहळू पार केले होते. आज त्यांनी आपले पहीले निरीक्षण पाठविले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागावर 50 डीग्री सेल्सिअस तापमान आहे. चंद्राच्या दक्षिण भागावर सुर्यादय झाल्याने दिवस आहे. तर चंद्राच्या 80 एमएम खोलीतील खड्ड्यातील तापमान मायनस 10 डीग्री सेल्सिअस नोंदले गेले आहे. चास्टेमध्ये दहा टेम्प्रेचर सेंसर लागले आहेत. जे 10 cm म्हणजेच 100mm खोलीपर्यंत पोहचू शकतात. ChaSTE पेलोडला स्पेस फिजिक्स लॅबोटरी, VSSC ने अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी सोबत मिळून बनवली आहे.

साऊथ पोलची का निवड

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की चंद्रावरील दक्षिण ध्रुवाची यासाठी निवड केली आहे की भविष्यात येथे मानवी वस्ती वसण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. साऊथ पोलवर सूर्यप्रकाश कमी वेळासाठी असतो. आता चंद्रयान-3 मातीचे तापमान पाठवित आहे. त्यावरुन मातीत तापमान कितीपर्यंत राहू शकते ते समजणार आहे.

नेमकी किती पेलोड नेले आहेत

चंद्रयान-3 मोहीमेचे तीन भाग आहेत. प्रॉपल्शन मॉड्यूल, लॅंडर आणि रोव्हर हे तीन भाग आहेत. यावर एकूण सात पेलोड आहेत. एकाचं नाव शेप असून तो चंद्रयान-3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूलवर तैनात आहे. प्रॉपल्शन मॉड्यूल सध्या चंद्राच्या भोवती फिरत आहे. ते पृथ्वीवरुन चंद्रावर येणाऱ्या रेडीएशनचा अभ्यास करीत आहे. तर चंद्राच्या लॅंडरवर तीम पेलोड आहेत. रंभा, चास्टे आणि इल्सा अशी त्यांची नावे आहेत. प्रज्ञान रोव्हर याच्या दोन पेलोड आहेत. एक उपकरण अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचे असून त्याचे नाव लेजर रेट्रोरिफ्लेक्टर आहे. ते चंद्रयानच्या लॅंडरला लावले आहे. हे चंद्राची पृथ्वीपासूनचे अंतर मोजण्यासाठी कामी येणार आहे.