बंगळुरु : चांद्रयान-3 च्या यशाच सेलिब्रेशन संपलेलं नाहीय. संपूर्ण देश अजून हे यश अनुभवतोय. चांद्रयानच्या यशासोबतच आणखी एक गोष्ट समोर आलीय. गुगल ट्रेंड्सनुसार, 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर 26 मिनिटांनी स्पेस हा शब्द इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केला जात होता. स्पेस शब्दासोबतच ‘स्पेस जॉब्स’, ‘इस्रो जॉब्स’ आणि ‘स्पेस करियर’ हे कीवर्ड 23-24 ऑगस्टच्या आसपास पीकवर होते. म्हणजे या शब्दांवरुन इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च सुरु होता. म्हणजे चांद्रयान-3 च्या यशाने हजारो भारतीय विद्यार्थ्यांना स्पेस इंडस्ट्रीतील करीअरचा विचार करायला भाग पाडलय.
अलीकडेच इस्रोच्या नोटमधून एक खुलासा झालाय. इस्रोची एक्टिविटी आणि त्यांच्याशी जोडलेल्या प्रायव्हेट सेक्टरमुळे देशात हजारो नोकऱ्यांची निर्मिती झालीय. चांद्रयान-3 च्या यशामुळे भारतीय प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणखी नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते.
आणखी नोकऱ्यांची निर्मिती
देशात एक डझनपेक्षा जास्त कंपन्या आणि 500 पेक्षा जास्त स्मॉल मीडियम एंटरप्रायजेस डिफेन्स आणि एयरोस्पेस बिझनेसशी संबंधित आहेत. इस्रोकडून अजून स्पेस मिशन्सवर काम चालू आहे किंवा सुरु होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात आणखी नोकऱ्यांची निर्मिती होईल.
देशात इतक्या हजार नोकऱ्यांची निर्मिती
इस्रोकडून सुरु असलेल्या एक्टिविटी आणि मिशन्समुळे 500 पेक्षा अधिक एमएसएमई, पीएसयू आणि मोठ्या खासगी उद्योग समूहांबसोबत एक इकोसिस्टम तयार झालय. ते भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. स्पेस एक्टिविटीमध्ये इंडस्ट्रीच्या भागीदारीमुळे देशात 45 हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. डिफेंस प्रोडक्शन, टेलीकॉम, मटेरियल, केमिकल आणि इंजीनियरिंग सारख्या अनेक सेक्टर्सना यामुळे खूप फायदा झालाय.
स्पेसमध्ये काम केल्यास या क्षेत्रातही मिळू शकते नोकरी
आयआयटी जोधपूरचे प्रोफेसर अरुण कुमार यांनी एका रिपोर्ट्मध्ये सांगितलय की, “इस्रोशिवाय स्पेस इंडस्ट्रीमध्ये नव्या जमान्याचे स्टार्ट अप आल्याने अनेक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. प्रायव्हेट सेक्टरमुळे अनेक संधी निर्माण होत आहेत. सॅटलाइट निर्मितीशिवाय स्पेस सॉफ्टवेअर आणि Apps सुद्धा आहेत. स्पेस इंडस्ट्रीसाठी ज्या नोकऱ्या उपयुक्त आहेत, त्याच मिसाइल, रडार आणि डिफेन्स सेक्टरसाठी सुद्धा उपयुक्त आहेत”