श्रीनगर – जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu Kashmir Police)दलात काम करणाऱ्या एका पोलीस सब इन्सपेक्टरचा (Police sub inspector)गोळ्यांनी चाळण केलेला मृतदेह सापडला आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पंपोर परिसरात गूढ स्थितीत हा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळावरुन दोन पिस्तुलांची काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. मृतदेह सापडल्यानंतर या संपूर्ण परिसरात सुरक्षादलांनी सर्च ऑपरेशन (search operation)सुरु केले आहे. फारुक अहमद वीर असे या पोलीस सब इन्सपेक्टरची ओळख पटलेली आहे. फारुक हे पंपोराच्या लेठपेराच्या 23 बटालियनमध्ये तैनात होतेय. त्यांच्या परिवारात वडील, पत्नी आणि तीन मुले आहेत. यात दोन मुली आणि एक मुलगा आहे.
J&K | A bullet-riddled body of a Police Sub Inspector was found under mysterious circumstances in Pampore area of South Kashmir’s Pulwama district. More details awaited.
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 18, 2022
शुक्रवारी संध्याकाळी फारुक अहमद हे मीर संबूसातून निघून आपल्या शेताकडे गेले होते. शेतात गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आणि त्यांची हत्या केली. त्यांच्या ह्रद्याजवळ गोळी लागल्याचे दिसते आहे. या हत्येमागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Sub inspector Police Farooq Ahmad Mir, shot dead by terrorists in area of #Pulwama, Kashmir. He was survived by his father, wife, 2 daughters and one son. Another Life Lost Serving the Nation ?? pic.twitter.com/vs4vhl6gDo
— Jahidhussain (@JahidHussain2) June 18, 2022
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या महिन्यापासून टार्गेट किलिंग सुरु आहे. दहशतवादी आता कर्मचारी, सामान्य माणसांबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करीत आहेत. तर दुसरीकडे सैन्य दलाकडून दहशतवाद्यांना रोखण्यासाठी वेगवेगळी ऑपरेशन्स राबवली जात आहेत. काही दिवसांपूर्वी कुलगाममध्ये सैन्यदलांनी दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलेले आहे. हे दोन्ही अतिरेकी हे लष्कर ए तोयबाशी संबंधित होते. यातील एक दहशतवादी हा 31मे रोजी झालेल्या कुलगामातील रजनी बाला या शिक्षिकेच्या हत्येत सामील होता.
सैन्यदलाने गेल्या काही काळात 99दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अनंतनागच्या हंगलगुंड परिसरात सैन्यदलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख जुनैद आणि बासित भट अशी झाली होती. गेल्यावर्षी अनंतनागमध्ये भाजपाचा सरपंच रसूल डार आणि त्याच्या पत्नीच्या हत्येत बासित या दहशतवाद्याचा समावेश होता, अशी माहिती आहे. तर शोपियातही झालेल्या एन्काऊंटरमध्ये दोन दहशतवादी ठार झाले होते.