पाटणा | 27 ऑगस्ट 2023 : मुंबईत विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडीया आघाडीची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होत आहे. या बैठकीत काही राजकीय पक्षांची आम्हाला साथ मिळणार असल्याचा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. भाजपा विरोधात विविध पक्षांची मोट बांधण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांनी या संभाव्य साथीदारांची नावे मात्र सांगितली नाहीत. मात्र, याबैठकीत जागा वाटपाच्या निवडणूकीसंदर्भातील चर्चा होईल असे नितीश कुमार यांनी सांगितले.
भाजपाच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत असून त्यांनी ‘इंडीया’ ( इंडीयन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव्ह अलायन्स ) स्थापना करण्यात आली आहे. पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही मुंबई होणाऱ्या आगामी बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसंदर्भात इंडीयाच्या रणनीतीवर चर्चा करणार आहोत. जागा वाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येऊन अनेक अंजेड्यांना अंतिम रुप दिले जाईल. काही राजकीय पक्षही आमच्यात सामील होतील.
त्यांनी पुढे सांगितले की, आपण 2024 च्या लोकसभा निवडणूकीआधी जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणू इच्छीत आहे. आणि त्याच दिशेने काम करीत आहे…माझी स्वत:ची अशी काही इच्छा नाही. लोकसभा निवडणूकीसाठी सत्तारुढ भाजपाला हरविण्यासाठी 26 विरोधी पक्षांच्या इंडीया आघाडीच्या महिनाभरात दोन बैठका झाल्या आहेत. विरोधी पक्षांची पहीली बैठक 23 जून रोजी पाटणा येथे झाली. दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बंगळुरु येथे झाली. आता 31 आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवसी तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.