पुणे : पुणे तेथे काय उणे (Pune) असे म्हटले जाते. परंतु या पुण्यातील मतदार उणे झाले आहे. कसबा मतदार (kasba by election) संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदार यादीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. म्हणजेच ज्या प्रमाणे गेल्या ६० वर्षांत चीनचा जन्मदर नीचांकी पातळीवर आला आहे, तसे पुण्यात झाले की काय? यामुळे मतदार घटले आहे.
भाजपच्या कसबा मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे कसबा मतदार संघातील मतदार यादी जाहीर झाली. या मतदार यादीत २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये मतदार कमी झाले. कसबा विधानसभा मतदारसंघात २०१९ रोजी एक लाख ४४ हजार १२४ पुरुष मतदार होते. एक लाख ४६ हजार ५५२ महिला मतदारांची नावे होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२३ ची मतदार यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली. त्यानुसार कसब्यात १५ हजार २२५ मतदारांची संख्या कमी झाली आहे. त्यात सात हजार २५४ पुरुष तर आठ हजार दोन महिला मतदार आहेत. आता कसबा मतदार संघात पुरुष मतदार एक लाख ३६ हजार ८२७ मतदार राहिले, महिला मतदारांची संख्या एक लाख ३८ हजार ५५० वर आली आहे.
का कमी झाले मतदार
मतदार कमी होण्यामागे लोकसंख्या कारण असण्याची शक्यता कमी आहे. परंतु मतदार यादीतील नाव आधार क्रमांकाला जोडले जात आहे. यामुळे दोन ठिकाणी नावे असणाऱ्या मतदारांची नावे कमी झाली आहे. तसेच काही मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे यादीतून कमी झाली आहे. यामुळे मतदार यादीत मतदार कमी झाल्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मतदार वाढले
कसबा मतदार संघात मतदार कमी झाले असताना पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार वाढले आहे. या मतदार संघात २०१९ मध्ये पाच लाख १८ हजार ३०९ मतदार होते. त्यात ४८ हजार १०६ मतदार वाढले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पुरुष मतदार आता तीन लाख एक हजार ६४८ मतदार आहेत. महिला मतदारांमध्येही २२ हजार ७५९ ने वाढ झाली आहे. या मतदार संघात एकूण मतदारांची संख्या पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार झाली आहे.
कसब्यातील घट
चिंचवडमधील वाढ