पुणे | 24 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचा विस्तार आणखी वाढवण्यात येणार आहे. त्याचवेळी बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस येणार आहेत. त्यासोबत आता गुगलवर पीएमपीची बस कुठे आहे? हे कळणार आहे. तसेच पीएमपीचे तिकीट ऑनलाईन काढता येणार आहे. त्यामुळे आता १४ पीएमपी बसेसमध्ये उप
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदाची सूत्र घेतल्यापासून बदल सुरु केले आहे. त्यांनी प्रवाशांसाठी अनेक चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरु केली आहे. आता पीएमपीसोबत गुगलचा करार झाला आहे. या करारानंतर गुगलला हवी असणारी माहिती देण्यात आली. यामुळे आता १४ पीएमपी बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहे. तसेच गुगलवरुन लाईव्ह लोकेशन मिळण्यासाठी चाचणी सुरु केली आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करता येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे पीएमपीची बस कुठे आहे? हे प्रवाशांना घरबसल्या समजणार आहे.
पीएमपीचे तिकीट ऑनालाईन करण्यात येणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाकडून अॅप, क्यूआरकोड, वेबसाइट याची मदत घेतली जाणार आहे. पीएमपी प्रशासनाने यासाठी बेस्टला संपर्क केला आहे. यामुळे बेस्टला ही सुविधा निर्माण करुन देणारी टीम लवकरच पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
पुणे शहरात पीएमपी बस सेवेच्या माध्यमातून रोज सुमारे दोन लाख जण प्रवास करतात. या सर्वांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे ‘पीएमपी’कडे असणाऱ्या सध्याच्या बसेसपैकी अनेक बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण ६५० बस घेण्यात येणार आहे. त्यासाठी या महिन्यात १९२ बसेस दाखल होत आहे.