पुणे : पुण्यातले सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने (CBI) आणखी एक मोठा दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयकडून त्यांच्या प्रॉपर्टीवर टाच आणण्यात आली होती. त्यांच्या अनेक मालमत्ता (Property) सीबीआयकडून जप्त केल्या होत्या. मात्र आता सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे. मनी लॉन्ड्री प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागे सुरू होता. सीबीआयकडून अनेकदा त्यांची चौकशी झाली होती. तसेच त्यांना अटकीही झाली होती. याच प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सीबीआयकडून कसूर करण्यात आली होती. हे प्रकरण आता दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढवताना दिसताहेत. यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
CBI seized a helicopter during search conducted at premises of builder Avinash Bhosale in Pune. He was allegedly involved in scam involving DHFL that caused loss of Rs 34,615 cr to a consortium of 17 banks led by Union Bank of India. The helicopter is AgustaWestland make: Sources pic.twitter.com/oGMLf9oK1k
— ANI (@ANI) July 30, 2022
भोंसले डीएचएफएलशी संबंधित घोटाळ्यात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घोटाळ्यात 17 बँकांच्या कंसोर्टियमचे 34,615 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सीबीआयने भोंसले यांच्या मालमत्तेतून जे हेलिकॉप्टर जप्त केले आहे ते ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे होते. अविनाश भोसले हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. अविनाश भोसले सध्या कोठडीत आहेत. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि येस बँकेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सोमवारी सीबीआयने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील आरोपी बिल्डर अविनाश भोसले यांनी लंडनमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांच्या खात्यातून 300 कोटी रुपये भरल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. ही मालमत्ता 2018 मध्ये खरेदी केली होती. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात असेही म्हटले आहे की रेडियस ग्रुपच्या सहआरोपी संजय छाब्रियाने 317.40 कोटी रुपये वळवले होते. हाच पैसा भोसले आणि त्यांच्या कंपनीने येस बँकेतून व्यवसाय कर्जाच्या नावाखाली उभा केला होता, असेही सांगण्यात आले आहे. हे प्रकरण आता कुठपर्यंत जाणार? हे तर पुढील कारवाईच सांगेल.