प्रकाश आंबेडकर यांचे ‘जवाब देना पडेगा’ म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर

| Updated on: Aug 08, 2023 | 5:22 PM

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉग्रेस नेते राहुल गांधी यांना ७ प्रश्न विचारले आहेत. तर, या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावीच लागतील असेही आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांचे जवाब देना पडेगा म्हणत राहुल गांधींना ते 7 प्रश्न! काँग्रेस काय देणार उत्तर
PRAKASH AMBEDKAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून हे सात प्रश्न राहुल गांधी यांना विचारले आहेत. राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. लोकसभेत त्यांची वापसी झाली आहे त्यामुळे ते सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यात व्यस्त आहेत. तरीही २ वेळा माजी खासदार म्हणून मला त्यांच्यासह सहयोगी पक्षांचे मूलभूत मुद्यांकडे लक्ष वळवायचे आहे’ असे म्हणत त्यांनी 7 प्रश्न ट्विट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोणते आहेत ते सात प्रश्न

– दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसी यांच्या खर्‍या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष कधी बोलणार? #ManipurCrisis आणि #ManipurViolence या दोन्हींबाबत तुमची प्रतिक्रिया अत्यंत उशीरा आणि राजकीय अचूकतेची (Political Correctness) अनुभूती देणारी होती.

– सरकारने लोकसभेमध्ये फूड डिलिव्हरी अॅपवरून ऑर्डर देण्यापेक्षा वेगाने पास केलेल्या कठोर #DataProtectionBill च्या चर्चेत तुम्ही भाग का घेतला नाही?

– जे थेट एका विशिष्ट उत्पादन उद्योगाला मदत करते, ज्यांचे शेअर्स बंदीनंतर वाढले आहेत? लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या धोरणावर कॉँग्रेस सरकारला कधी कोंडीत पकडणार आहे. भारतातील भ्रष्टाचाराच्या बीजाबाबत निवडणूक रोख्यांबाबत तुमची भूमिका काय आहे?

– #ManipurCrisis वर तुमची आघाडी खरा प्रश्न कधी विचारणार आहे? हिंदू मैती यांना अनुसूचित जमाती (ST) चा दर्जा का दिला गेला? कोणत्या पक्षाने ही प्रक्रिया सुरू केली? या निर्णयावर आघाडीची काय भूमिका आहे?

– मैला वाहून नेण्याची प्रथा संपुष्टात आली आहे, याचा दोन्ही सभागृहात वारंवार पुनरुच्चार करून सांगण्यात आलेल्या सरकारच्या आकडेवारीशी आणि उत्तराशी तुम्ही सहमत आहात का?

– एससी उपयोजना आणि एसटी उपयोजना निधी हमी योजनांसाठी वळवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे तुम्ही स्पष्टीकरण कसे द्याल?

– माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे नियमितपणे हिंदु राष्ट्राची मागणी करणाऱ्या बागेश्वर बाबाचा पाहुणचार करत असतील (Hosting Bageshwar Baba) तर काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आहे?

काँग्रेस नेते काय उत्तर देणार ?
प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेल्या या प्रश्नांना आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना, ‘प्रिय राहुल गांधी, तुमचा आवाज बंद करण्यात आला होता, पण याकाळात संपूर्ण काँग्रेस आणि आघडीचाही आवाज बंद करण्यात आला होता का?’ असाही सवाल केला आहे. तर, ट्विटच्या शेवटी ‘जवाब देना पडेगा’ असं म्हणत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना या प्रश्नांकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करता येणार नाही असेही बजावले आहे.