रत्नागिरी : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेड सभा घेतली. त्या सभेला ठाकरे गटाचे बहुतेक सर्व नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेडमध्ये सभा घेणार आहेत. 19 तारखेला खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे. ज्या गोळीबार मैदानात ठाकरे यांनी सभा घेतली त्याच गोळीबार गोळीबार मैदानात होणार आहे. सभेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानातच रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा होणार आहे. शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी गोळीबार मैदानात स्टेज उभारणीला सुरुवात झाली आहे. गोळीबार मैदान हाउसफुल करण्यासाठी शिवसैनिकांची नियोजनाची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येत आहे.
शिवसैनिक सभेला उपस्थित राहण्यासाठी कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची ज्या ठिकाणी सभा झाली होती, या सभेला उत्तर देण्यासाठी खेड तालुक्यातील गोळीबार मैदानात ठाकरे गटाला आव्हान देणाऱ्या सभेचे आयोजन करण्यात आलं. ज्या ठिकाणी हे सभा होणार आहे.
शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथे सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे. रामदास कदम यांनी दुसऱ्याचं दिवशी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. १०० वेळी खेडमध्ये आलात तरी योगेश कदम याला निवडणुकीत पाडू शकणार नाही, असा इशारा दिला होता. या सभेची तयारी रामदास कदम करत आहेत.
आता मुख्यमंत्री शिंदे यांची खेडमध्ये सभा होत आहे. या सभेची जोरदार तयारी केली जात आहे. शिवसैनिक कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून ते तयारी करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे हे खेडमधून उद्धव ठाकरे यांना कसं उत्तर देतात, हे पाहावं लागेलं. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीचं स्पर्धा सुरू आहे. ज्यास्त लोकं कोणाच्या सभेला आहेत, यावरून पुन्हा दावे, प्रतिदावे केले जातील.