दापोली : भरधाव ट्रकने प्रवासी वडापला धडक दिल्याने अपघातात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीतील दापोली तालुक्यात घडली. यात अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. दापोली ते हर्णै दरम्यान आसूद जोशी आळी येथे काल दुपारी 3.30 सुमारास हा भीषण अपघात घडला. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना दोपाली उपडिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झला आहे. अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमीचा खर्च देखील सरकार करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
#रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत…
हे सुद्धा वाचा— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, वडापमध्ये एकूण 14-15 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दापोलीकडे जाणाऱ्या ट्रकने हर्णेकडे जाणाऱ्या वडापला धडक दिली. या दुर्दैवी घटनेत 2 अल्पवयीन मुली आणि रिक्षा चालकासह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनिल सारंग असे या रिक्षाचालकाचे नाव असून, तो हर्णे गावचा रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.