“रामदास कदम यांच्या पराभवाच्या आदल्या दिवशी कुत्री रडत होती”;राष्ट्रवादीच्या नेत्यानं टीका करताना मर्यादा ओलांडल्या

| Updated on: Apr 02, 2023 | 11:55 PM

विजयी झाल्यानंतर सदानंद चव्हाण मुंबईला रामदास कदम यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यावेळी रामदास कदम यांचा गुहागर मतदारसंघातून पराभव झाल्यामुळे त्या पराभवाचे खापरदेखील सदानंद चव्हाण यांच्यावरतीच त्यांनी फोडले होते.

रामदास कदम  यांच्या पराभवाच्या आदल्या दिवशी कुत्री रडत होती;राष्ट्रवादीच्या नेत्यानं टीका करताना मर्यादा ओलांडल्या
Follow us on

चिपळूण/रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्य शाब्दिक चकमक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये चांगलेच युद्ध रंगले आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली खेड मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी खालच्या पातळीवर जाऊन शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. माजी आमदार संजय कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांना बोबड्या दळभद्री या प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. संजय कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी निवडून येण्यासाठी काय काय केले होते.

त्यांच्यावरूनही जोरदार त्यांनी हल्लाबोल केला आहे. रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तीन भगत आणले होते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली होती. मात्र त्यावेळी ते 13 हजार मतांनी रामदास कदम पराभूत झाले होते. असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचा राजकीय इतिहासच उलघडून दाखविला. यावेळी त्यांनी सांगितले की, वीर मतदान केंद्रावर रामदास कदम यांना गुहागर मतदार संघामध्ये ज्या वेळी निवडणूक झाली त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना केवळ 1 मत मिळाले होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गुहागर मतदारसंघात ज्यावेळी रामदास कदम यांचा पराभव झाला त्याच्या आदल्या दिवशी रामदास कदम यांच्या जामगे गावातील कुत्री रडत होती अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

गुहागर मतदार संघातून रामदास कदम पराभूत झाले,त्यावेळी चिपळूण मतदार संघातून सदानंद चव्हाण शिवसेनेकडून विजयी झाले होते.

विजयी झाल्यानंतर सदानंद चव्हाण मुंबईला रामदास कदम यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यावेळी रामदास कदम यांचा गुहागर मतदारसंघातून पराभव झाल्यामुळे त्या पराभवाचे खापरदेखील सदानंद चव्हाण यांच्यावरतीच त्यांनी फोडले होते. आणि त्यांच्याशी अर्वाची भाषेत त्यांच्यासमोर ते बोलले होते त्याचा खुलासा त्यांनी आज केल्याने कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली खेड मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना म्हणाले की, चोऱ्या माऱ्या केलेले रामदास कदम, अडाणी रामदास कदम अशी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. रामदास कदम यांची उंची साडेचार फूट, आणि त्यांच्या मुलाची उंची 6 फूट अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.