नाशिकः शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून चाललेल्या न्यायालयीन लढाईवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभा आहेत. त्यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सुनील बागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकला आलो आहे. या दौऱ्यावेळी ते म्हणाले की, मला आज दिल्लीला सुप्रीम कोर्टात जायचे होते, मात्र शिवसेनेचा नेता असेल कोणत्याही सभेत गर्दी कमी पडत नाही असंही त्यांना यावेळी सांगितले. सुनील बागुल आपण आजातशत्रू असल्याचे सांगत संजय राऊत यांनी त्यांचा गौरवही केला.
खासदार संजय राऊत यांनी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कालचे विधानाचा संदर्भ देत त्यांनी त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथ विधीचा प्रश्न उपस्थित केला, आणि त्याच शपथविधीचे साक्षीदार असलेले आमदार दिलीप बनकर आज उपस्थित असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
यावेळी त्यांनी शिंदे गटाकडून देण्यात येत असलेल्या आव्हानाला प्रतिआव्हान देत संजय राऊत यांनी सांगितले की, 2024 मध्ये संपूर्ण नाशिक काय पूर्ण राज्य ताब्यात घेऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेविषयी बोलताना ते म्हणाले की,या नाशिकच्या शिवसेनेवर सुनील बागुल यांची छाप आहे. जी आज इथे दिसते आहे, तिच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेतून ज्यांनी बंड केले त्यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, झाडावरची काही पानं गळून जातात. नाशिकमध्येसुद्धा काही नासकी पानं गळून गेली आहेत असा टोला बंडखोर नेत्यांना त्यांनी लगावला आहे.
त्यामुळे वसंत ऋतुत जसा बहार झाडाला येतो तसाच बहार नाशिकमध्ये पुन्हा येणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी नाशिकच्या ठाकरे गटाविषयी व्यक्त केला आहे.
सुनील बागुल वाढदिवस साजरा करतात बाकीच्यांचा काढदिवस असतो काढदिवस साजरा करतात. शिवसेनेवर संकट येत आहे शिवसेना संपून जावी, ती नष्ट व्हावी यासाठी इथूनपासून दिल्लीपर्यंत कटकारस्थान चालू आहेत.
मात्र कुत्रा निष्ठावान असतो. कुत्रा कितीही निष्ठावान असला तरी वाघाच्या सेनेसोबत लढण्यासाठी कुत्र्यांची फौज चालत नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, नाशकात शिवसेनेचा पहिले महाअधिवेशन झाले त्यावेळेस राज्यात पहिली शिवसेनेची सत्ता आली होती.
त्यामुळे नाशिकची शिवसेना ही मजबुतीने आहे आणि यापुढेही राहिल त्यात काही वाद नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
बाळासाहेब सांगायचे वयानं म्हातारा व्हावे विचाराने नाही. त्यामुळे शिवसेनेच्या स्थापनेनंतर देशात 280 सेना निर्माण झाल्या पण दोनच सेना शिल्लक राहिल्या एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना.
प्रधानमंत्री स्वतः मुंबईला येतात मुंबई दिल्ली अपडाऊन करत आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कितीही प्रयत्न करा पन मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल,
नाशिक आणि ठाण्यात ही शिवसेनेचाच झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांमध्ये गद्दार आणि बेइमानांना स्थान नाही.
त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेला जिंकून देऊन शिवसेनेचा दरारा महाराष्ट्रात कायम ठेऊ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, या सरकारने मला 110 दिवस तुरुंगात टाकले होते, पण मी अजिबात खचलो नाही.
कारण ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने मला दिल्लीपर्यंत नेलं त्या शिवसेनेसाठी माझ्या आयुष्यातले 110 दिवस मी दिले आहेत. त्यामुळे 2024 ला मी सत्तेत येऊ तेव्हा याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आता रडायचं नाही ही मर्दाची छाती आहे आणि वाघाचं काळीज आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.