Krishi Sanjeevani: नागपूर जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्यांची पंढरी, कृषी संजीवनी मोहीम 25 जून ते 1 जुलैपर्यंत

| Updated on: Jun 25, 2022 | 10:44 AM

कृषी विद्यापीठाचे संशोधित तंत्रज्ञान, अद्यावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाईल. त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी प्रभावीपणे करण्यासाठी सप्ताहात मोहीम स्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे. ब्लॉग स्पॉट या कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती krushivibhag.blogspot.com माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

Krishi Sanjeevani: नागपूर जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्यांची पंढरी, कृषी संजीवनी मोहीम 25 जून ते 1 जुलैपर्यंत
कृषी संजीवनी मोहीम 25 जून ते 1 जुलैपर्यंत
Follow us on

नागपूर : कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत (Shetkari) पोहचविण्यासाठी कृषी संजिवनी (Krishi Sanjeevani) मोहीम 25 जून ते 1 जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात प्रत्येक दिवशी महत्वाच्या तंत्रज्ञान व प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येईल. कृषीविषयक प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी केले आहे. 25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन यावर मोहीम राबविण्यात येईल. 26 जून रोजी पोष्टीक तृणधान्य दिवस, 27 जून महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून रोजी खत बचत दिन याचा प्रचार प्रसार जिल्ह्यात करण्यात येईल. 29 जून रोजी प्रगतशिल शेतकरी संवाद दिवस, 30 जून रोजी शेतीपूरक तंत्रज्ञान दिवस व 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार

कृषी विभाग, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, कृषी संलग्न विभागाचे अधिकारी, कृषी मित्र मिळून या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधित तंत्रज्ञान, अद्यावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाईल. त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी प्रभावीपणे करण्यासाठी सप्ताहात मोहीम स्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे. ब्लॉग स्पॉट या कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती krushivibhag.blogspot.com माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

येथे पाहता येणार शेतकऱ्यांच्या यशोगाथा

ऑटो रिप्ले कृषी विषयक योजनांची माहिती व्हॉटस्ॲपवर मिळविण्यासाठी 918010550870 या क्रमांकावर कीवर्ड असा व्हॉटस्ॲप संदेश पाठवावा. ज्या योजनांची माहिती हवी आहे, त्या योजनेचा किवर्ड टाईप केला की, त्या योजनेची तत्काळ माहिती प्राप्त होईल. या ऑटो रिप्ले सुविधेचा सुध्दा मोहिमेच्या दरम्यान प्रचार प्रसार व माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. http//www.youtube.com/c/AgricultureDepartment.Gom हे कृषी विभागाचे यु-टयु चॅनेल आहे. या मोहिमेदरम्यान यु-टयु वरील शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा