मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार साईल यांना आता पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. साईल यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, साईल यांनी सहार पोलिसांकडे संपूर्ण माहिती नोंदवली आहे. आम्ही सुरक्षेच्या मागणीसाठी गेलो होतो. आम्हाला सुरक्षा देण्यात आली आहे. सहार पोलिसांत तक्रार केली असून, क्राईम ब्रँचकडे सर्व पुरावे जमा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Police protection to Prabhakar Sail, Evidence in Sameer Wankhede case given to Crime Branch)
यात काही मागणी झालेली आहे. त्यातील काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. आमच्या क्लाईंटच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आम्ही सुरक्षेची मागणी केली आहे. आमची ही मागणी मान्य करण्यात आली, असं साईल यांचे वकील म्हणाले. एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचा भांडाफोड केला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर होते. कालही त्यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.
अॅड. कनिष्ठ जयंत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचं अपहरण केलं आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली. अशा स्वरुपाची लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. एका प्रकारे फिल्म इंडस्ट्रिजवर दबाव आणण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे, अशा स्वरुपाची तक्रार करण्यात आल्याचं जयंत यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
‘महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नाही म्हणून बदमान करण्याचा घाट’, जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा
‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
Police protection to Prabhakar Sail, Evidence in Sameer Wankhede case given to Crime Branch