जयकुमार गोरेंकडून मृत मागासवर्गीय व्यक्तीची जमीन लाटण्याचा प्रयत्न
Image Credit source: फेसबुक
आता मुंबई उच्च न्यायालयानेही आज गोरे यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी गोरे यांना दोन आठवड्यांची मुदत दिली गेली आहे त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन आठवडे गोरे यांच्यावर अटकेची कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र गोरे हे लवकरच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यामुळे सेशन कोर्टापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टात तरी गोरे यांना दिलासा मिळणार का ? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठारणार आहे.
प्रकरण काय आहे ?
जयकुमार गोरे यांच्यावर दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून गोरे आणि त्यांच्या चार साथीदारा विरोधात ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक जो मयत आहे. त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे. दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. माण खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकां विरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती.