मुंबई / 24 ऑगस्ट 2023 : कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा अंतरिम दिलासा न्यायालयाने कायम ठेवला आहे. किशोरी पेडणेकर यांना 29 ऑगस्टपर्यंत दिलासा कायम आहे. बॉडी बॅग किट खरेदी कथित गैरव्यवहार प्रकरणात 29 ऑगस्टपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला निर्देश दिले आहेत. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर दाखल करण्यात गुन्हा आलाय.
बॉडी बॅग किट खरेदी कथित गैरव्यवहार प्रकरणात 29 ऑगस्टपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला निर्देश दिले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांचंही आरोपी म्हणून नाव आहे. एकूण चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
डेड बॉडी किट बॅग हे अवास्तव किमतीत विकत घेतले होते असा आरोप आहे. 1300 रुपये किंमत असणारी बॉडीबॅग 6800 रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र या आरोपात पेडणेकर यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नाहीत आणि त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा कोर्टात पेडणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.