मुंबई : कोकण रेल्वेचे (Kokan Railway) शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावरील मेल-एक्स्प्रेसची (Mail-Express) वाहतूक (Transportation) आता सरासरी वेगाने त्या-त्या सेक्शनच्या गरजांनुसार करणे शक्य होईल. त्यामुळे वाहतूक क्षमतेत वाढ होणार असून त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. तसेच यापूर्वी डिझेलवर गाड्या चालविताना बोगद्यांमध्ये प्रवाशांना धुराचा त्रास सहन करावा लागायचा, आता हा त्रास पूर्णपणे नाहीसा होणार असून हायस्पीड डिझेलवरचे सरकारचे पैसेदेखील वाचणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून हिरवा झेंडा दाखवून कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचा प्रकल्प राष्ट्राला आज बहाल करण्यात आला. कोकण रेल्वेच्या 741 कि.मी.च्या मार्गाचे विद्युतीकरण शंभर टक्के पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेसारख्या स्वायत्त महामंडळाने स्वातंत्र्यानंतर पूर्ण केलेला हा पहिला मोठा प्रकल्प ठरला आहे. रोहा आणि (मंगळुरू) ठोकूरदरम्यान मार्ग बांधण्यासाठी
1990 मध्ये कोकण महामंडळाची स्थापना झाली तर 1 मे 1989 रोजी कोकण रेल्वे प्रकल्प तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पन केला गेला आणि 26 जानेवारी 1989 रोजी या मार्गावरील पहिल्या कोकण रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. रत्नागिरी, मडगाव आणि उडुपी येथील इलेक्ट्रिक लोकोंना पंतप्रधान मोदी यांनी आज झेंडा दाखविला. सांगितले.
आणि ध्वनिचे प्रदूषण यातून संपूर्णपणे सुटका मिळणार आहे. शिवाय बोगद्यांमध्ये निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासातूनही सुटका होणार आहे. दरवर्षी हायस्पीड डिझेलचे दीडशे कोटी वाचणार आहेत व गाड्यांचा वेग वाढणार असून वाहतूक क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाबरोबर अधिक चांगल्या सोयीसुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्यासाठी या विद्युतीकरणाची मदत होणार असल्याचे कोकण रेल्वेचे उपमहा प्रबंधक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर यांनी