मुंबई : शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने (MPSC Recruitment 2023) आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संकेतस्थळावर सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता दिलेल्या माहितीत बदल करण्यात आला आहे. या पदाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे नमूद केले होते. मात्र, या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक ७.४ मध्ये सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे अनावधानाने नमूद झाले आहे. सदर संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नाही
हे सुद्धा वाचा— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 20, 2023
तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती
पदवी घेताना किंवा घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी MPSC ची तयारी रात्रंदिवस करतात. पंरतु आतापर्यंत मोठी भरती मोहीम निघाली नव्हती. आता गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती निघाली आहे. ही भरती MPSC च्या नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. यासाठी गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा कधी असणार?
MPSCने तब्बल ८ हजार १६९ जागांची जाहिरात काढली आहे. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. यामुळे अभ्यासासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. राज्यातील ३७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गट-ब सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/MCMN6Peqpt
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 20, 2023
किती पदे
नुकतेच पुण्यात केले आंदोलन
पुण्यातील अलका चौकात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. एमएपीएसचं अभ्यासक्रम 2023च्या ऐवजी 2025 पासून बदलण्यात यावं, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.