मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार करणार मार्गदर्शन. हवामान खात्याचा विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
अनेक दिवसांपासून श्रीकांत शिंदे मुंबईतील अनेक प्रश्नांवर भाष्य करताना पाहायला मिळतायत.
तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेत आहेत.
मुंबईतील विविध विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत शाखा संपर्क अभियान सुरु केलं आहे, या दरम्यान लोकांशी संवाद साधत आहेत
संवाद साधत असताना नागरिकांच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी श्रीकांत शिंदे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेत आहेत.
श्रीकांत शिंदे मुंबईत अधिक लक्ष घालत असल्याने मुंबई महानगरपालिकेसाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.
गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ जळगावात जोडे मारो आंदोलन
पडळकर आणि मुनगंटीवार यांच्या फोटोला मारले जोडे
शरद पवारांचा अपमान केल्यास जळगावात पाय ठेवू देणार नाही,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा
सांगली –
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात काँग्रेसची पोस्टरबाजी
चक्क नाना पटोले यांचे झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर
इस्लामपूर शहरातल्या चौकात आणि रस्त्यांवर काँग्रेसचे नंदकुमार कुंभार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केला उल्लेख
नाना पटोले यांच्या पोस्टरची इस्लामपूर शहरासह सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आता जोरदार संघर्ष निर्माण होणार असल्याची चर्चा रंगली
राजस्थानमधील जयपूर येथील अंडर गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी धमकीचा मेल
मेलमध्ये 15 लाख हिंदू मुलींची माहिती इस्लामिक देशांना देणार असल्याची धमकी
धमकीनंतर राजस्थान पोलिसांनी केली कारवाई
आरोपी संजय सोनी याला अटक
सांगली
“आताच्या सरकारला एका वर्षात मस्ती आली आहे, साडेतीन जिल्ह्यातला पक्ष सरकार पाडू शकतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे”
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांची भाजप-शिंदे सरकारवर टीका
सांगलीत जोरदार हल्लाबोल
सांगली शहरांमध्ये राष्ट्रवादी सांगली जिल्हा पक्षाच्यावतीने बूथ कमिटीची आढावा बैठक
या आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे सांगली दौऱ्यावर
मुंबईः
काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
संजय निरुपम यांनी पत्रातून नाले सफाईत घोटाळा झाल्याचा आरोप केला
संजय निरुपम यांनी मुंबईतील नालेसफाई घोटाळ्याची चौकशी करण्याची केली मागणी
मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्णपणे आवश्यक
मुंबईत नाल्यांची साफसफाई पूर्णपणे झालेली नाही
नाले साफसफाई न करण्याला जबाबदार कोण ? निरुपमांचा सवाल
पुणे :
वादळामुळे रस्त्यावर पडलेले झाड शिवप्रेमींनी केले बाजूला
भाजप आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून रायगडावर शिवप्रेमींचा प्रवास
चाळीसगाव ते किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघाले होते
बसेसचा ताफा पुण्याच्या मुळशीजवळील ताम्हिणी घाटात आला त्याचवेळी झाड उन्मळून पडले
महाराष्ट्र भरातून रायगडकडे जाणाऱ्या हजारो शिवप्रेमींनी ते झाड केले बाजूला
मुंबई :
तीन दिवसांपूर्वी मालाड मालवणी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
मंगल प्रभात लोढा यांची माहिती
देशी खेळांसाठी आपण ही जमीन राखीव ठेवणार असल्याचे केले स्पष्ट
गोराईमध्ये 136 एकर एमटीडीसीची जमीन
तिथे वॉर म्युझियम प्रस्तावित
तिथे नौदल व आरमार यांची माहिती देणारे म्युझियम उभारण्यात येणार
उद्या 350 वा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या कामाची सुरुवात
जे अतिक्रमण या जमिनीवर असेल ते तात्काळ उद्या हटवण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार
नारायणगाव/पुणे :
कलेची जादू सलुनच्या ब्लोअरमध्ये नाही तर कारागिराच्या बोटांवर
खासदार अमोल कोल्हेंनी केले सूचक वक्तव्य
खासदार कोल्हे यांनी त्यांच्याच मतदार संघातील नारायणगावमधील सलूनमध्ये केली दाढी
फक्त केस कापण्याची कला सुचविण्यासाठी हा खटाटोप नाही तर यातुन कोल्हेंनी वेगळच काय सुचवायचं का अशी चर्चा
नवी दिल्ली:
भाजपने मोदी सरकारच्या 9 वर्षाचा लेखाजोखा मांडला
सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते प्रकाशन
काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल
राहुल गांधींनी प्रेमाचे नाही तर तिरस्काराचे दुकान उघडल्याची टीका
मानवत येथे विद्यार्थिनीची काढली छेड
छेड काढणाऱ्या रोडरोमीओस अटक
पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
पोलिसांनी चिडीमार विरोधी पथक स्थापन करण्याची मागणी
भाम्ला फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
या कार्यक्रमात अनेक कलाकार उपस्थित आहेत
कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार उद्या मुंबईत
उद्या सकाळी 9.30 पासून राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहणार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्या राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांना भेटणार
रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर सिनेस्टाईल दरोडा
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पाहणी केली
जिल्हा पोलिसांकडून तपासाचा घेतला आढावा
संशयित दरोडेखोरांपर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील
काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले
सांगली :
रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर सिनेस्टाईल दरोडा टाकून 14 कोटींचे दागिने लुटण्यात आले
याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत जिल्हा पोलिसांच्याकडून तपासाचा घेतला आढावा
संशयित दरोडेखरांच्यापर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील, त्या दृष्टीने तपास सुरू, काही महत्त्वाचे धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती
यवतमाळ :
पाणी प्रश्नांवर यवतमाळ नगरपालिकेतील नगरसेवक आक्रमक
गेल्या 10 दिवसांपासून शहरातील बांगर नगर वंजारी फैल विठ्ठलवाडी भागात पाणी टंचाई
नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या दरवाजाला लाथ मारून केला राग व्यक्त
जीवन प्राधिकरण कार्यालयात नगरसेवकांचा राडा
काँग्रेस नगरसेवक छोटू पावडे, सेना नगरसेवक उद्धव साबळे, छोटू सवाई यांचा गदारोळ
अधिकारी-कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
नागपूर :
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात डबा बैठक आयोजित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील डबा बैठकीची परंपरा भाजपात
या बैठीत देवेंद्र फडणवीस हे जेवणाचा डबा घेऊन सहभागी होणार
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन
पुणे :
ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पुण्यात श्रद्धांजली
काँग्रेस पक्षाकडून पुण्यात श्रद्धांजली वाहत शोकसभेचं आयोजन
तिरंगा मेणबत्ती लावत अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली
अपघातातील जखमी प्रवाशांसाठी काँग्रेसकडून प्रार्थना
पुण्यातील हडपसर भागात श्रद्धांजली सभेचं करण्यात आलं आयोजन
श्रद्धांजली सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
मालेगाव :
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या मनोहर जोशी यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनोहर जोशी यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. मनोहर जोशी यांना आयसीयूतून शिफ्ट करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
संजय राऊत यांना डॉक्टरांची गरज आहे असं म्हणत दीपाली सय्यद यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या थुंकीप्रकरणानंतर दीपाली सय्यद यांनी राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाने त्रास झाला. त्यांनीच त्यांना रुग्णालयात दाखल करुन इलाज करावा. राऊंतावर इलाज होणं गरजेच आहे नाहीतर दुसरंच काही वेगळं होऊन जाईल”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकांना मोजून 1 वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र त्याआधीच कोण कुठून लढणार, तसेच प्रत्येक पक्षाने मतदारसंघावर आपली दावेदारी ठोकायला सुरुवात केली आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशकातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. नाशकातील लोकसभेची एक जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली आहे.
ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटील यांच्या दोघांमध्ये पुन्हा खडाजंगी झाली आहे. धाराशीव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही नेते आपसात भिडले. तेरणा प्रकल्पाच्या बंद पाईपलाईनच्या मुद्दयावरुन या दोन्ही नेत्यांमधीला वादाला तोंड फुटलं. मात्र तानाची सावंत यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला.
केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. नड्डा यांनी 2014 च्या आधीच्या आणि नंतरच्या काळात खूप फरक असल्याचं म्हटलं. नड्डा यांनी यावेळेस मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीचा पाढा वाचला. तसेच मोदी सरकारच्या कामांचं कौतुक केलं.
पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे
जयंत पाटलांची भेट घेत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे
स्किल टेस्ट रद्द करा यासह इतर पाच मागण्यांचे निवेदन दिले निवेदन
जयंत पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांशी या प्रकरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर
आणि भाजप आमदार जगजीत सिंह पाटील यांच्यामध्ये खडाजंगी
तेरणा येथील प्रकल्पच्या बंद पाईपलाईन मुद्यावरून शाब्दिक वादाला सुरूवात
अखेर पालकमंत्री डॉ तानाजी सावंत व आमदार चौगुले यांच्या मध्यस्थीनंतर यावर वाद मिटला
भंगारचोर, बाळ आहेस अजून तु अजून असे आमदार जगजीत सिंह हे ओमराजे यांना म्हणाले.
औकातीत रहा, तेरणा ट्रस्टचा लुटार, पिता पुत्र चोर अश्या शब्दात ओमराजे यांनी आमदार पाटील यांना सुनावले
यापूर्वी देखील खासदार ओमराजे व आमदार जगजीत सिंह यांच्यात झाला आहे मोठा वाद
आज काल लिखाणाचे कौतुक फार तर मोबाईलवर होते
समोरा समोर कुणीच कुणाचे कौतुक करत नाही
राजाराम बापू पाटील यांच्या नावाने ही ललित कला अकादमी सुरू झाली याचा मला आनंद आहे
मराठी साहित्यिक हे केवळ महाराष्ट्रतातच आहेत असे नाही, सगळीकडे ते पोहोचले आहेत
आजकाल मराठी नाटके खुप कमी झाले आहेत
आलिकडे नाट्यगृहात राजकीय नेत्यांच्या सभाच खूप होत आहेत, सांगली जिल्हा हा साहित्यिकांचा गर्दीचा जिल्हा आहे.
10 दिवसापासून शहरातील बांगरनगर वंजारी फैल भागात पाणी टंचाई
नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाच्या दरवाजाला लाथ मारून केला राग व्यक्त
जीवन प्राधिकरण कार्यालयात नगरसेवकांचा राडा
नगरसेवक छोटू पावडे, नगरसेवक उध्दव साबळे, छोटू सवाई यांचा गदारोळ
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज किसननगरमध्ये
अनेक प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे
त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले
किसननगर नंबर एक याठिकाणी क्लस्टर योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी
मुख्यमंत्री येणार आहेत याच ठिकाणी असणारा खडतर रस्ता पालिकेने तीन तासात
नवीन रस्ता बनवला, तीन तासांमध्ये रस्ता तयार करत पालिकेने मोठा विक्रमच केलाय
येत्या 8 ते 10 दिवसांत काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणार आहे आंदोलन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर या आंदोलन उपस्थित राहणार आहेत
नाशिकच्या चांदवड येथे शेतकरी मेळावा आणि आंदोलनाचे आयोजन
कांद्याला भाव मिळावा, शेतीपिकाला योग्य भाव मिळावा,
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत त्वरित मिळावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि नाशिक जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली आर/मध्य विभाग कार्यालयाचा घेराव केला आहे
भाजप कार्यकर्ते बीएमसी कार्यालयाच्या गेटवर बसून आंदोलन करत आहेत
बीएमसीने बोरिवली पश्चिम येथील शिवाजी नगर झोपडपट्टीत बांधलेली शौचालये
कोणतीही नोटीस न देता पाडली आहेत. यामुळे खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक झाले आहेत
शौचालयाच्या प्रश्नाबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी आर/मध्य विभाग गाठला
अगोदर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही.
गोपाळ शेट्टी हे सर्व नगरसेवकांसह बोरिवली आर/मध्य विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करत आहेत.
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान
काल झालेल्या वादळीवाऱ्यासह वाशिम जिल्हात मोठे नुकसान झाले आहे
वादळी वाऱ्यामुळे रिसोड तालुक्यातील अनेक गावांना बसला मोठा फटका
मागुळझनक, देगाव, केशवनगर भागांमध्ये 30 तासापासून बंद आहे वीज पुरवठा
70 गावाची वीज खंडित झाली आहे.
एका हल्लेखोराने आसाम-अरुणाचल सीमेजवळ गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 2 लोक ठार आणि 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे एसपी रंजन भुयान यांनी दिली.
आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे एसपी रंजन भुयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने आसाम-अरुणाचल सीमेजवळ गोळीबार केला. या हल्ल्यात 2 लोक ठार आणि 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे
राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सिल्व्हर ओकवर नमाज पढायला जातात का, असा खोचक प्रश्न विखे पाटलांनी विचारला आहे. तसेच आरोप करताना तारतम्य ठेवायला हवं, असा सल्लाही विखे पाटील यांना राऊतांना दिला. राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना विखे पाटलांनी राऊतांवर टीका केलीय.
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 1100 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 950 हून अधिक जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी 170 मृतांची ओळख पटली आहे.
लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जोरदार वाऱ्यामुळे स्टेडियममध्ये लावलेला बोर्ड पडला आणि त्याखाली तीन लोक दबले गेल्याची माहिती आहे.
-या सरकारला काहीच घेणं देणं नाही, कायदा सुवियवस्था वाऱ्यावर आहे. अहमदनगरला औरंगजेबाचे फोटो दाखवले जातात केवळ शब्दांचा मारा उपमुख्यमंत्री करतात. संभाजीनगरलाही असंच झालं पुन्हा तेच चित्र पाहायला मिळतंय हे दुर्दैवी असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
– कॅबिनेट विस्तार काही होणार नाही. 50-50 चा फाॅर्म्युला केलाय, भाजपमध्ये आणि शिंदे गटात नाराजी आहे. ज्यांना पद मिळणार नाही ते जातील या भीतीने कॅबिनेट विस्तार होणारच नाही.
– पडळकर यांना कोण विचारतंय पण सुधीर मुनगंटीवार सारख्या नेत्यांने शरद पवार यांचा एकेरी ऊल्लेख करणं मंत्री पदाला शोभणारं नाही.
– कुणी मुख्यमंत्री व्हावं हे जनता ठरवते, पण कार्यकर्त्यांनी संयम ठेवायला हवं नेत्यांमध्येही एकवाक्यता हवी.
-कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई मग जाय आपल्या माहेरा पण कारल्याला काही कारलं येत नाही आणि सुनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत व्यवस्था असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
-मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल तुम्ही कशाला एवढं मनावर घेता.
-विस्तार झाला नाही तरी राज्यातलील कामं झाली आहेत.
-आता तुम्हीही विस्ताराच्या बातम्या दाखवणे बंद करा.
-जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा दिवसभर बातम्या दाखवा.
-अनेक ठिकाणी पालकमंत्री नाहीत. त्यामुळे विस्तार लवकरात लवकर करावं लागणार
-कालच्या बैठकीनंतर अमित शाहांकडून विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळेल.
-विस्तार होईल तेंव्हा आरपीआयला एक मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे.
-लोकसभेच्या दोन जागा आरपीआयला द्याव्या ही आमची मागणी आहे.
-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगलं संबंध आहेत.
-केंद्राचा विस्तार पण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.
-राज्यात RFO च्या बदल्या झाल्यात, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बँक खात्यात पैसे वळते करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या चार आमदारांनी केला या वर नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार वर जोरदार टीका केली आहे.
– महाराष्ट्र राज्यातील सरकार शंभर टक्के भ्रष्टाचार करणारं आहे. सुधीर मुगंटीवार यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचे चार आमदार जर आपल्या मंत्रावर आरोप लावत असतील तर हे दुर्दैवी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
– महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वन विभागामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार हा दुर्दैवी आहे सुधीर मुनगंटीवार सारखा तत्त्व सांगणारा माणसाच्या खात्यात पैसे वढत असतील तर हे महाराष्ट्राच दुर्दैवी आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
-डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे त्यांना त्रास झालाय का?
-डॅाक्टर त्यांच्यावर उपचार करतील, काहींनी राजकारणाची हद्द पार केलीय
-सार्वजनिकपणे थुंकलं जातंय, समाजाला चांगल्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या.
-तुम्हाला काही गोष्टी आवडल्या नाही तर मतं मांडा, तुम्ही सुधारायला पाहीजे.
– नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– ‘बाप तो बाप होता है बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देण्यात आल्या
– दोन समाजात तेड निर्माण करण्याच्या आरोपाखाली चौघांविरोधात गुन्हा
– सरफराज जहागिरदार , सरवर शेख , व अफनान शेख अशी आरोपीची नावे
– या तिघांवर भादंवि 505(2) ,298,34 प्रमाणे गुन्हा दाखल
– अगोदर माहिती असते तर स्वागताला बुके घेऊन गेली असते
– जेव्हा गडकरी साहेबांचा कार्यक्रम असतो तेव्हा मला निमंत्रण असतं
– केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा
– केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत
– बालसोर दुर्घटनेत हात पाय गमावलेल्या पीडीतांना पश्चिम बंगाल सरकारची मदत
– अपंग पीडीतातील कुटुंबातील एका सदस्याला होमगार्डची नोकरी
देशात आणि महाराष्ट्रात आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत.
त्यामुळे कोणी औरंगजेबाचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा
अहमदनगरमध्ये उरूसात औरंगजेबाचे फोटो घेऊन तरूण नाचत होते
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल
– काही हौशी कार्यकर्त्यानी माझं नाव पुढे केलं आहे
– महाविकास आघाडीत मेरिटनुसार जागावाटप व्हावे
– राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला
– अमरावतीमध्ये काही सर्व्हे असेल म्हणून अनिल देशमुख यांनी दावा केला असेल
– जालन्यात राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आहेत
राज्यातील अनेक विषयांसंबंधीही केली चर्चा
महिला बचतगटाचे सक्षमीकरण होईल -मुख्यमंत्री
तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार
– सिंधी समाजाची मी माफी मागितली आहे, मोर्फ केलेला व्हिडीओ समोर आणला गेला
– 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा नव्हे तर 350 व्या वर्षाला सुरुवात आहे.
– मात्र सध्या 15 ऑगस्ट हा पण 16 ऑगस्टला साजरा केला जाईल, सर्वच बदलत आहे, आव्हाड यांची टीका
राष्ट्रवादीच्या दालनात चंद्रकांत दानवेंच्या नावाची रंगत्ये चर्चा
जालन्यातून राष्ट्रवादी चंद्रकांत दानवेंना लोकसभेसाठी उतरवणार असल्याचे वृत्त
भाजपामध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली टीका
कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपात परत जाणार नाही, खडसे यांनी केले स्पष्ट
ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंसोबत आंदोलन करणारे साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया त्यांच्या कामावर परतले आहेत.
मात्र आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्याग्रहासोबत रेल्वेप्रती असलेली जबाबदारी निभावत आहे – साक्षी मलिक
माण तालुक्यात दहिवडीसह पश्चिम भागाला सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार फटका बसला.
वादळी वाऱ्यासह पावसामुळे विजेचे खांब,झाडांची पडझड झाली.
पावसामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आल्याने छोट्या पूलांवरून पाणी वाहू लागलं.
बिजवडी येथील प्रशांत विरकर यांच्या साडेतीनशे होऊन अधिक आंब्याच्या झाडांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे किंमती व मौल्यवान मुद्देमाल नागरिकांना पुन:प्रदान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मुद्देमाल हस्तांतरण सोहळा
गेल्या १ वर्षात पुणे पोलिसांकडून तब्बल 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आज तो फिर्याद (तक्रार) दिलेल्या नागरिकांना पुन:प्रदान करण्यात येत आहे.
या मुद्देमालमध्ये मोबाईल, सोन्याचे दागिने यासह इतर मौल्यवान वस्तू आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्याकडून या वस्तू हस्तांतरण करण्यात येत आहे.
निलंबित वकील सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप.
मराठा समाजातील काही लोकांनी माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला – सदावर्ते
माझ्या घराच्या खाली लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अडवलं.
मी पोलिसात रीतसर तक्रार करणार, मात्र रद्द झालेलं आरक्षण असं करून मराठा समाजाला कधीच मिळणार नाही.
भंडारा, मुंबई नंतर बुलढाण्यातही भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचे पोस्टर झळकले.
काँग्रेस कार्यकर्ते हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावत आहेत.
भंडारा, मुंबईनंतर बुलढाणा जिल्ह्यातही भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पोस्टर लावले.
आपापल्या राजकीय नेत्यांच्या प्रेमापोटी हे कार्यकर्ते त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावत आहेत.
मात्र या संपूर्ण पोस्टरबाजीमुळे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री होण्याची कोणाकोणाची महत्त्वकांक्षा आहे ?, हे समोर येत आहे.
कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांची सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा असणे सहाजिकच आहे.
हीच महत्वकांक्षा आता या पोस्टरबाजीच्या माध्यमातून समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
खामगाव शहरातील मुख्य भाग असलेल्या टॉवर चौकात हे पोस्टर लागले आहेत.
त्यामुळे या संपूर्ण भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरबाजीमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीत बापात बाप नाही, लेखात लेख नाही अशी अवस्था आहे
त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न बघण्या गोदर जागा वाटपावर लक्ष दिलं तर महत्त्वाचं राहील.
एका बाजूला जागा वाटपाचं घोंगडं भिजत ठेवायचं, दुसऱ्या बाजूला आम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत म्हणायचं, हा छुपा गेम मला दिसतो.
ज्यांची चौकशी सुरू आहे, ते सर्व मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले आहेत.
उद्या रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार,
शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात.
रायगडावर महाराष्ट्रसह देशातून मोठया संख्येने शिवभक्त दाखल.
संयोगीताराजे संपूर्ण कामाचा आढावा घेत आहेत.
महाविकास आघाडीने मंजूर केलेले कामे एक वर्ष या गद्दार सरकारने रखडवली.
एक हिरोईन आणि एक बुजगावणे कोणत्या पक्षाचे आहे माहीत नाही
नाव न घेता काँग्रेस आमदार यशोमती ठाकुरांचे राणा दाम्पत्यावर टीकास्त्र..
निवडुन येण्यासाठी आमच्याकडे येतात मग तिकडे जाऊन कुरघोडी करतात.
लोकशाही मध्ये जे तुम्हाला मतदान देतात त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे.
आता या गद्दारांचे दहा माहिनेच राहले.
यांना काय नाचायचे नाचू द्या.
गुरुदेव सेवा मंडळातील बालकांनी नाना पटोले मुख्यमंत्री होण्याची व्यक्त केली इच्छा
नाना पटोले यांचा आज त्यांच्या मूळ गावी सुकळी येथे वाढदिवस साजरा
मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सुकळी या गावी केली गर्दी
लहान बालकांनी नाना पटोले यांना केक भरवत बर्थडे केले सेलिब्रेशन
नाना पटोले यांनी सुद्धा मोठा उत्साहात लहान मुलांना केक भरवत सेलिब्रेशन केले
– अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक
– सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले
– बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा या मागणीसाठी काम बंद पाडण्याचा प्रयत्न
– या भागातील शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे शेड काढून मशिनरी पाडल्या बंद
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिला इशारा
– सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेच्या मंजूर मार्गाचे काम सुरू झाले होते मात्र ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न
अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी अग्नीशमन दलाचे अधिकारी सिद्धिविनायक मंदिरात दाखल
अग्नीशमन दलाचे अधिकारी पाहणीसाठी सिद्धिविनायक मंदिरात दाखल
मंदिरातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आल्याची प्राथमिक माहिती
भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात मंदिरातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती मंदिरानं दिली
अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील हजर
मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडून लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांच्या चेकचे वाटप
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर
प्रल्हाद सिंह पटेल यांच्या उपस्थितीत आज दौंडमध्ये केडगाव चौपुला या ठिकाणी लाभार्थी मेळावा झाला
लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या चेकचे वाटप करण्यात आले
भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी रवींद्र टंडन, दौंडचे आमदार राहुल कुल, महिला अध्यक्षा कांचन कुल, किसन मोर्चाचे वासुदेव काळे आणि कार्यकर्ते उपस्थित
प्रल्हाद सिंह पटेल पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा
आज त्यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे जाहिर सभेला उपस्थिती लावली
दुपारी ते इंदापूर तालुक्यातील लघु व्यावसायकांशी ते जंक्शन या ठिकाणी संवाद साधणार
तसेच बारामती तालुक्यातही विविध ठिकाणी भेट देणार
– तालुक्यातील पिण्याचे पाणी, रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन
– अक्कलकोट-सोलापूर महामार्ग ठाकरे गटाने रोखला
– अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहावे लागले ताटकळत
– उजनीतील दोन टीएमसी पाणी मिळावे तसेच रस्त्याची कामे निकृष्ट करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी रास्ता रोको
– अक्कलकोट- सोलापूर महामार्गांवर हे रास्तारोको आंदोलन
– रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक
– आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू
– दिल्लीतील दोन दाढीवाल्यांच्या इशाऱ्यावर हे डोंबारी सरकार नाचते
– दरम्यान आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती
आजारी पत्नीला भेटण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
तीन आठवड्यांचा जमीन मंजूर
26 जूनला होणार पुढची सुनावणी
सुनावणी वेळी पत्नीच्या आजाराबाबतची कागदपत्रे सादर करावी लागणार
प्रदीप शर्मा यांना अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती
शिरूर लोकसभेनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू झाला आहे
स्वतः शरद पवार आज बैठकीत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतं आहेत
संभाव्य उमेदवारावरतीही बैठकीत चर्चा सुरू आहे
सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स या शोरूममध्ये काल भर दिवसा दरोडा
पडलेल्या सशस्त्र दरोडामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास
अंदाजे 15 ते 20 किलो सोने आणि हिरे मानके केले लंपास
परराज्यातील ही टोळी असल्याचा पोलिसांचा अंदाज.
बीडच्या आष्टीत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा 23वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न
या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेची काढली भव्य मिरवणूक
टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी आणि भाविक मिरवणुकीत झाले मंत्रमुग्ध
महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी
ठिक ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी तर रिंगण सोहळा देखील पार पडला
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंडन करत केले आंदोलन..
येवला प्रांत कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत केले मुंडन…
कांद्याला दोन हजार रुपये हमीभावाची.. निर्यात होणाऱ्या कांद्याला अनुदान…
विक्री झालेल्या कांद्याला लाल कांद्याप्रमाणेच अनुदानाची मागणी…
खताच्या किमती कमी करण्याची मागणी…
मंदिरातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले असल्याची प्राथमिक माहिती
भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात मंदिरातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिराकडून देण्यात आली आहे
अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील आहेत
राऊतांनी पवारांच्या सांगण्यावरुन सेनेत फूट घडवली – संजय शिरसाट
निमंत्रण नसतानाही आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभाही झाले – संजय शिरसाट
मातोश्रीचा आब संजय राऊतांनी घालवला – संजय शिरसाट
पूर्वी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार देखील मातोश्रीवर नमन करायचे – संजय शिरसाट
अमित शाहा यांच्यासोबत विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात अनेक प्रकल्प वेगानं सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मंडल आयोगाची अमलबजावणी शरद पवार यांनी केली – अजित पवार
महिलांना प्रतिनिधीत्व न देणं त्यांना पटत असेल. त्यांना वाटत असेल 20 लोकांचे मंत्रिमंडळ नीट चालते – अजित पवार
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.
ज्याचे जसे संस्कार आहेत तसे ते बोलतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती – अजित पवार
पण दुसऱ्याकडून तरी अजिबातच अपेक्षा नाही, अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला.
कांद्याला भाव द्यावा या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको
हातनूर टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग
कांद्याला रास्त भाव देण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी
देवेंद्र फडणवीस सुलोचना दीदींच्या अंत्यदर्शनाला
सुलोचना दीदींची कारकिर्द थक्क करणारी – देवेंद्र फडणवीस
ग्रामसडक योजनेचे कामे अर्धवट राहिल्याचा आरोप करत आमदार यशोमती ठाकूर संतापल्या…
पावसाळ्यात जर रस्ता बंद झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही; कंत्राटदाराला खडसावलं..
खोकेवाल्यांचे सरकार या पद्धतीने निधी वाटपात भेदभाव करीत आहे, याचा जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल….
मुंबईत पाणीपट्टी दरवाढ नको – आशिष शेलार
पाणीपट्टीत दरवाढ न करण्याची आयुक्तांकडे मागणी – आशिष शेलार
मुंबईकरांना अप्पर वैतरणामधीर सरकारच्या साठ्यातून पाणी मिळणार – आशिष शेलार
लिटरमाहे २५ पैसे ते ४ रुपयांपर्यंत पाणीपट्टी वाढ प्रस्तावित
भाजपच्या कोअर कमिटीची उद्या मुंबईत बैठक
सुलोतना दीदींच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुलोतना दीदींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार
बैठकीमध्ये बरेचसे मुद्दे मांडले
स्थानिक लोकांच्या समस्यांना वाट मोकळी करण्याचं काम आमच्यामार्फत केलं जातंय
खासदार अनुराग ठाकूर हे आले जरी किंवा फिरले जरी तरी मला काही फरक पडणार नाहीये
कारण आमची युती जास्त मजबूत होईल
भाजपा आणि शिवसेना आणखी मजबूत होईल, येत्या दिवसात दिसेल
साडे तीन लाख मते होती, ती आणखी वाढतील
अक्कलकोट तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रास्तारोको आंदोलन सुरु
तालुक्यातील ग्रामस्थाना रस्ते हलक्या प्रतीचे असून त्याविरोधात रास्ता रोको आंदोलन
अक्कलकोट-सोलापूर महामार्ग ठाकरे गटाने रोखला
अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहावे लागते ताटकळत
श्रीमंत शाहू छत्रपती यांचा दावा
1974 ला कोल्हापुरात 300वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता
त्याच वर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी देखील साजरी झाली होती
श्रीमंत शाहू छत्रपतींची माहिती
त्यामुळे उद्या होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा च
श्रीमंत शाहू छत्रपतींनी उद्या न्यू पॅलेस परिसरात होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीची केली पाहणी
प्रदीप शर्मांना तीन आठवड्याचा अंतरिम जामीन
आगामी निवडणुका युतीत लढणार
राज्यातील विकासाच्या प्रश्नावरही शाहांसोबत चर्चा
मविआच्या काळात रखडलेले प्रकल्प मार्गी लावले
सहकार विभागाबाबत सकारात्मक चर्चा
लोकसभा, विधनासभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा
विरोधकांना दुसरं काम नाही, त्यांना टीकाच करायची आहे
आपण लक्ष द्यायचे नाही
दादर येथील निवास स्थानी मुख्यमंत्री पोहोचले
सुलोचना दीदी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश
सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कोर्टाने काय निकाल दिलाय यावर जनजागृती सुरु
याचाच भाग म्हणून सोशल मीडियावर ठाकरे गटाकडून कोर्ट काय म्हणाले यावर व्हिडिओ अपलोड केले जात आहेत
निकालात न्यायालयाने काय म्हटलंय, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जाताहेत
याआधी ठाकरे गटाकडून महत्वाच्या मुद्यांची प्रत संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली होती
सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार
अजित पवारांनी ठरवायचे आहे
अजित पवारांसोबतच्या मुसद्दी नेत्यांनी ठरवायला पाहिजे
जे उद्धव ठाकरेंबाबत झाले राज ठाकरे सोबत झाले
राज ठाकरे सारखा नेता असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व गेले
पिंपळवाडी येथे अॅसिड, तलवार, कुऱ्हाडीने हल्ला
युवकाच्या डोळ्यावर अॅसिड ओतले, तर महिलांचे तलवारीने डोके फोडले
सख्या चुलत भावानेच हल्ला केल्याची माहिती
किरण देवकाते, संगिता देवकाते यांच्यावर झाला हल्ला
राजेंद्र देवकाते, अशोक देवकाते यांच्या मुलाने हल्ल्याचा आरोप
दिनकर अण्णा फॅन क्लबच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल झाली
मी 2 वर्षांपासून लोकसभेची तयारी करतो आहे
मला तयारी करायला वरिष्ठांनी सांगितलं आहे
रवींद्र अनासपुरे यांनी मला काम सुरू करायला लावलेल आहे
पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य
सुपारी घेऊन मी काम करत नाही
मोदींच्या नेतृत्वात देशात भाजप निवडून येईल
ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका कोर्टापर्यंत नेली
ओबीसी आरक्षणाबाबत शिंदे-फडवणील सरकारने काय केलं?
बावनकुळेंना जे बोलायचं ते बोलू द्या
बावनकुळेंच्या वक्तव्यावर जास्त लक्ष देत नाही
सासवडमध्ये आज जोडे मारो आंदोलन
आंदोलनाला माजी मंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती
ओबीसी समाजाला न्याय देण्याकरीता फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं
भाजपनं ओबीसी नेत्याला देशाचं पंतप्रधान केलं
ओबीसींच्या इम्पेरिकल डेटासाठी मविआने निधी दिला नाही
सरकार आल्यानंतर दोन महिन्यात ओबीसीला आरक्षण मिळालं
थेट सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ मानले जाणारे सुहास कांदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
गिरणा धरणात घेणार जलसमाधी
तालुक्यातील शेकडो मच्छीमार जल समाधीत कांदे यांच्यासह सहभागी
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मच्छीमार विरुद्ध ठेकेदार वाद
हजारो लोक आंदोलनात सहभागी
पोलिसांकडून लाईफगार्डसह बंदोबस्त
थोड्या वेळातच आमदार सुहास कांदेही पोहचणार आंदोलनस्थळी
स्थानिक मच्छमाराना सवलत मिळावी
गिरणा धरणावरील अवैधरित्या दिलेला रद्द करा यासह अनेक मागण्या
सामना वृत्तपत्र राज्य सरकारकडून 50 लाख जाहिरातीचे घेतात
महापालिकेतील सर्वात जास्त जाहिराती यांच्या पेपरला जातात
सरकारी तुकड्यावर जगणाऱ्यांनी हे बोलणे उचित नाही
नैतिकतेची भाषा करतात मग तुमच्या मालकाच्या सरकारमध्ये लोकांचे जीव गेले तेव्हा पश्चताप झाला का?
आमचे रेल्वे मंत्री तिथे रात्रभर होते ते चांगलं काम करत आहेत
त्यांचे मालक परदेशी फिरत आहेत, ते कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशापासून
दुसऱ्यांना नैतिकता शिकवता मालकाने कधी राजीनामा दिला का?
खरी शिवसेना दिल्लीत जात नाही म्हणता मग तुमचा मालक जनपथवर किती वेळा गेला?
दिल्लीला मातोश्रीची मम्मी आहे
Cbi चौकशीवर बोलता मग श्रीधर पाटणकरबद्दल बोल ना
शरद पवारांनी याची कानातून रक्त काढेपर्यंत लायकी काढली आहे म्हणून आता अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही
एक इंटरनल सर्व्ह मविआचा झालाय
यात शिवसेनेला बावीस जागा आणि मविआ पडेल असं दिसतंय
येणाऱ्या निवडणुकीत 22 चे दोन कसे होतील बघा
चायनीज शिवसेनेचा नेता आहे हा, त्यांची शिवसेना चायनीज
राहुल गांधी यांच्या दौऱ्याची चौकशी व्हावी
उद्धव ठाकरे जनपथवर उद्धव ठाकरे साडी घालून जायचा का?
हिजड्याचं प्रमुख यांना म्हणायचं का?
मोदींवर टीका करण्यापेक्षा तुझ्या मालकाने काय केलं सांग
अजित दादांनी कार्यकर्यांना सुनावलं
कामं केली नाही तर कानाखाली देईन, पद काढून घेईन
लोकांची कामं करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहेत
पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या होणार स्वतंत्र बैठका
थोड्याच वेळात पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला होणार सुरुवात
या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार राहणार उपस्थित
तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार घेणार आढावा
या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित
एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल
एसडीआरएफच्या चार बोटींकडून शोधमोहीम सुरू
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
काल नवनियुक्त विश्वस्तांच्या बैठकीत मुख्य विश्वस्तांची झाली निवड
पोपट खोमणे यांची प्रमुख विश्वस्तपदी झाली निवड
स्थानिकांना प्राधान्य न दिल्यामुळे सुरु आहे जेजुरीकरांचे आंदोलन
आंदोलन सुरु असताना प्रमुख विश्वस्त निवडल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता
भाजपच्या इच्छुक उमेदवाराकडून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर टीका
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट मधून शिवसेना खासदारांवर टीका
नाशिक लोकसभेच्या जागेवरून निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी
भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेच्या खासदारांवर गद्दार म्हणून उल्लेख करत पोस्ट मधून टीका
भाजपच्याच इच्छुक नगरसेवकाकडून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्याच खासदारावर गद्दार असल्याची सोशल मीडियातून टीका