पुण्याच्या कारभारात अजित पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाने चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे. पुण्याचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे मात्र अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याचं बोललं जात आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. “रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंदाचा दिवस आहे. गॅसच्या किमती कमी केल्याने माझ्या कुटुंबातील बहिणींना दिलासा मिळेल. त्यांचे जीवन सुसह्य होईल. माझी प्रत्येक बहीण सुखी, निरोगी, आनंदी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
रक्षाबंधन का पर्व अपने परिवार में खुशियां बढ़ाने का दिन होता है। गैस की कीमतों में कटौती होने से मेरे परिवार की बहनों की सहूलियत बढ़ेगी और उनका जीवन और आसान होगा। मेरी हर बहन खुश रहे, स्वस्थ रहे, सुखी रहे, ईश्वर से यही कामना है। https://t.co/RwM1a1GIKd
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2023
रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादीत महत्वाच्या पदावर नियुक्त्यांचे सत्र सुरु आहे.
राज्यात काही भागात पावसाने ओढ दिली आहे. काही भागात अजूनही पाऊस नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. पण येत्या काही दिवसांत पाऊस पडेल, तसा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाबाबत महत्वाची बैठक झाली. निती आयोगाची बैठक झाली. मुंबई आणि एमएमआर एक ट्रिलियनचे उद्दिष्ट्य गाठू शकतं, असा निती आयोगाचा दावा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईची, महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
उद्यापासून देशात घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. केंद्र सरकराने देशातील लाखो गॅसधारकांना ही भेट दिली आहे. ऐन सणासुदीत गॅस सिलेंडरचे दर उतरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उज्ज्वल योजनेतील सिलेंडर 400 रुपयांनी स्वस्त होणार आहे. या योजनेतील ग्राहकांना 75 लाख कनेक्शन मोफत मिळणार आहेत.
किशोरी पेडणेकरांना दिलासा मिळाला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची विनंती केली होती.
सोलापूर लोकसभा लढवणार का या प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे यांनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली. जी जबाबदारी पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी लोकांसाठी आणि पक्षासाठी पार पाडेल. सीडब्ल्यूसीवर निवड होणे ही काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. याचे संपूर्ण श्रेय हे सोलापूरकरांचे आहे.
मंत्रालयामध्ये अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रलयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. .यावेळी मंत्री दादा भुसे तिथे पोहोचत आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होणार. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांची महाराष्ट्रात 11 दिवसांची शिवशक्ती यात्रा सुरू होणार आहे.
पुलवामा हल्ल्यामु़ळे कलम ३७० हटवलं, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती देण्यात आली आहे. भारताचे सॉलिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे. ३७० कलम हटवल्यानंतर त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकेच्या सुनावणी दरम्यान तुषार मेहता यांनी माहिती दिली आहे.
नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून आणखी एक दिलासा मिळाला आहे. हमीदार सादर करण्यासाठी नवाब मलिक यांना वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मलिक यांची १४ ऑगस्टला जामिनावर सुटका झाली आहे.
शर्मिला ठाकरे यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
जागर यात्रेवरून परत येताना माझी गाडी खड्ड्यात बद पडली होती, कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. मग सामान्यांना किती त्रास होत असेल, असा जाब त्यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची कन्या सना मलीक या मंत्रालयात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी सना यांनी वेळ मागितली होती. नवाब मलिक यांची ईडी कोठडीतून नुकतीच जामिनावर सुटका झाली होती.
मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा. परळच्या शाखेपासून ते केईएम रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
अपुरा औषध पुरवठा , डॉक्टर्स आणि मशीनची कमतरता असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला. मात्र आपल्या मागण्यांकडे, तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत हा मोर्चा काढला जात आहे.
पुण्याच्या कारभारामध्ये अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रकात पाटील नाराज असल्याची चर्चा. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुष्काळ आपल्या दारी येऊन ठेपला आहे, याची पुसटशी तरी जाणीव आहे का ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विचारला आहे. दुष्काळ परिस्थितीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 10 लाख रुपयांचं बनावट पनीर जप्त केलं आहे. एकूण 4 हजार 970 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नरेंद्र बोंडेकर हे सरकारविरोधात मोर्चा काढणार आहेत. बहुजन समाजातील 58 जातींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जेजुरीत खंडेरायाच्या गाभारा दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. गाभाऱ्याचं काम ५ ऑक्टोबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती भंडार गृहात दर्शनासाठी ठेवणार आहे.
पुण्यात 4 हजार 970किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ऐन सणसुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात बनावट पनीरचा साठा जप्त झाला आहे.
भाजपकडे 2024 साठी कुठलाही अजेंडा नाही. देशात बेरोजगारी, महागाई आहे. चीनची घुसखोरी आहे. या प्रश्नाकडे लक्ष न देता धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
औरंगाबाद शहरातील एका महिलेने पाकिस्तानी तरुणासोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला देश विघातक कृत्यांमध्ये समावेश असल्याचा ई-मेल औरंगाबाद पोलिसांना मिळाला आहे. या ईमेल नंतर औरंगाबाद एटीएसकडून महिलेची कसून तपासणी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 15 हजार घरकुलांचे वाटप यावेळी होणार आहे. सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून उभारण्यात आलेल्या 15 हजार घरांचा चावी लाभार्थींना दिली जाणार आहे.
इंडियाला कुणी काऊंटर करु शकत नाही. उद्या दुपारी 4 वाजात इंडियाची बैठक. बैठकीला सर्व मोठे नेते उपस्थित राहणार.
2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी हल्ला घडवण्याची भीती. इंडियाच्या बैठकीवेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा होणार. भारताच्या जमिनीवर चीनचा ताबा. हिंमत असेल चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरु आहे. या कामाची नुकतीच चाचणी करण्यात आली, त्यामध्ये दहा पोल तपासण्यात आले होते. त्यापैकी एका पोलचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पालिकेकडून बांधलेला पोल जमीनदोस्त करण्यात आला. यामुळे या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
भुसावळमध्ये एकनाथ खडसेंना धक्का. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. भुसावळ शहरातील राष्ट्रवादीच्या खडसे गटाला मोठे खिंडार.
कावड यात्रेतील लोकांना तलवार दाखवल्याप्रकरणी आणि परवानगी नसतानाही डीजे लावल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हे दाखल. कळमनुरी पोलिसात गुन्हे दाखल. काल हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आमदार बांगर यांनी कावड यात्रा काढली होती.
कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन्स अर्धातास उशिराने धावत आहेत.
देशभरात पावसाच्या कमतरतेचे संकट. केंद्र सरकारने घेतला देशातल्या अनेक राज्यांचा आढावा. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही केंद्र सरकारकडून दखल. कमी पाऊस झालेल्या भागात जिल्हाधिकाऱ्यांना पीक सर्वेक्षणाचे आदेश. विमा कंपन्यांनाही शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत 60 टक्के कमी पाऊस
काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राहुल यांचा युरोप दौरा आहे. युरोपमधल्या विद्यापीठात राहुल गांधी यांचे व्याख्यान आहे. बेल्जियममधील खासदारांना राहुल गांधी भेटणार आहेत. भारतात G 20 बैठक होत असतानाच राहुल गांधी युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. ममता बॅनर्जी बिग बी अमिताभ बच्चन यांना राखी बांधणार आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ आणि ममता यांची भेट महत्त्वपूर्ण आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी बीड येथील सभेत बोलताना तब्बल 20 वर्षानंतर तेलगी प्रकरणावर भाष्य केलं. भुजबळांनी थेट शरद पवार यांना सवाल केला होता. त्याचे पडसाद काल उमटले. नाराज शरद पवार समर्थकांनी आंदोलन केलं. आजही त्याचे पडसाद उमटू शकतात. दरम्यान काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज बैठक होऊ शकते. विशेषाधिकार समितीची आज बैठक होईल. चौधरी यांनी सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले होते.
राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होऊ शकते. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.