मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : प्रधानमंत्र्यांचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याचे काम करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. दोन्ही नेत्यात चर्चा. दिल्लीसह एनसीआर परिसरात जोरदार पाऊस सुरू. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. आम आदमी पार्टी राजस्थान विधानसभेच्या सर्वच्या सर्व 200 जागा लढणार. यासह राज्य आणि देश-विदेशातील घडामोडी जाणून घ्या.
भाजपच्या आमदारांची आज भोपाळमध्ये कार्यशाळा पार पडली आहे. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केले आहे. देशभरातील 650 आमदारांना प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्रातील 47 आमदारांचा यामध्ये समावेश होता. 4 राज्यात होऊ घातलेल्या निवडणूकांची जबाबदारी ही आमदारांवर देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील 47 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही आमदारांवर आहे.
कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात शुल्कमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क वाढ करण्यात आलीये. 31 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू करण्यात आलंय. सप्टेंबरमध्ये कांद्याचे बाजार भाव वाढण्याची शक्यता असल्याने लादले कांद्यावर निर्यात शुल्क. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना दिवसभर जमिनींवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील हा सर्व प्रकार आहे. दिवसभरात ५१ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यात आहेत. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावातील उपकेंद्रमध्ये रूग्णाचे हाल होताना दिसत आहे.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना किरीट सोमया यांनी 18 पानाची नोटीस पाठवली आहे. नोटीस नेमकी कशा संदर्भात हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकले नाहीये. नोटीस वाचल्यानंतर सडेतोड उत्तर देईल, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. असल्या नोटीशीला मी घाबरत नाही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचे देखील अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दक्षिण मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे. या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हस्ते पार पडणार आहे. खासदार अरविंद सावंत कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत. थोड्याच वेळाच उद्धव ठाकरे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे विरोधकांवर निशाणा साधतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बुलढाणा : ‘सामना’ वृत्तपत्राचं नाव ‘सामना’ ऐवजी टोमणा नाव ठेवले पाहिजे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी केलीय. “सामना”मधून फक्त टोमणे मारले जातात, असा टोला त्यांनी लगावला.
सामना कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पहारा सुरु केला आहे. सामना वृत्तपत्राविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर भाजपने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यामुळे सामना कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पहारा दिला आहे.
आमदार संतोष बांगर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. विद्यार्थ्यांना एसटी बस वेळेत मिळत नसल्याने हा वाद झाला. त्यावेळी त्यांनी एसटी कंडक्टरला शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली.
दोन दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात मान्सून धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मराठवाड्यात पावसाची अवकृपा झाली आहे. पण मान्सून सक्रिय होईल. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने हा इशारा दिला आहे. आता नागपूरसह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचलं आहे.
19 Aug, येत्या 2 दिवसात मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात मान्सून अधिक राहील. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
Pl आयएमडी अपडेट्स पहा. pic.twitter.com/TLSQ0YRLLh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 19, 2023
उद्योगपती रतन टाटा याना उद्योग विभागाच्या वतीने देण्यात येणारा पहिला उद्योगरत्न पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांचा हात आपल्या हातात घेऊन त्याना सन्मानाने आपल्या सोबत आणून बसवले. त्यानंतर त्याना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. मात्र टाटा यांनी आपला हात विश्वासाने मुख्यमंत्र्यांच्या हातात दिल्याने या सोहळ्यातील हा क्षण विशेष लक्षवेधी ठरला.
अभिनेत्री दीपाली सय्यद निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. दीपाली सय्यद शिंदे गट शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या मी शिवसेना मध्ये आहे, मला पक्षप्रवेशाची गरज नाही. कुठून निवडणूक लढवणार याचा शोध सुरू आहे. दीपाली सय्यद लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष म्हणून मी निमंत्रण स्वीकारलं नाही. मीही पत्रकारितेत अनेक वर्ष काम केलं आहे. पूर्वी ब्लॉक लावले जायचे. प्रत्येक अक्षर समोर ठेवलं जायचं. तेव्हा मी सुद्धा ब्लॉग लावायचो. तेव्हापासूनची आतापर्यंतची मी पत्रकारिता पाहत आलोय असं राज ठाकरे म्हणाले.
पत्रकारिता अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. सध्याची देशातील पत्रकारिता पाहता जिवंत शब्द वापरला. महाराष्ट्र वेगळा होता, वेगळाच राहणार असं राज ठाकरे म्हणाले.
राजकारणाची भाषा सध्या बदलली आहे. पत्रकारांवरील हल्ले निषेधार्ह, आम्हाला सुद्धा राग आहे. ट्रोल करणाऱ्यांसाठी राजकीय पक्षांनी लोक पाळली. पिंपरी-चिंचवड येथे पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते.
अत्यंत धक्कादायक ! वयाच्या २५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, निधनाचं धक्कादायक कारण समोर; सिनेक्षेत्रात खळबळ… अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. वाचा सविस्तर
बागलकोटमधील शिवरायांचा पुतळा हटवल्याप्रकरणी पुण्यात आंदोलन करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारविरोधात पुण्यात हिंदू महासंघ आक्रमक झाले आहे. पुण्यातील कर्नाटक बँकेत हिंदू महासंघाचं आंदोलन
उद्धव ठाकरे हे शरद पवार नाहीत तोंडावर एक आणि ओठांवर एक… शरद पवार यांच्या भूमिकांवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे.
राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून रतन टाटा यांचा सन्मान होणार आहे…
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून पिंपरी येथील कार्यक्रमस्थळी जाऊन धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली.
२७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये अजित पवार गटाची उत्तर सभा होणार होती. मात्र ही सभा रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवारांच्या भाषणानंतर उत्तर सभा रद्द करण्याची भूमिका काही लोकांनी घेतल्याचे समजते.
वंदे भारत एक्स्प्रेस नव्या रूपात दाखल होणार. वंदे भारत एक्स्प्रेसला केशरी रंगाचा साज. मुंबई-कोल्हापूर मार्गावर केशरी वंदे भारत धावणार असल्याची चर्चा सुरू.
‘INDIA’ आघाडीच्या बैठकीची जोरात तयारी सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या देखरेखेखाली तयारी सुरु आहे. 6 राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे सरकारसोबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सरकारला त्यांना सुरक्षा द्यावी लागेल, असं संजय राऊत म्हणालेत.
आम्ही सामनाच्या विरोधात तक्रार करणार आहोत. आता लढाई कोर्टात अन् रस्त्यावरही लढणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
पुण्याच्या शिक्रापूर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन मुलींकडून एका ज्येष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं. तेव्हा भाजपने युती तोडली, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपचं सध्याचं दुकान बनावट असल्याचा राऊतांनी आरोप केला आहे. २०१४ आणि २०१९ ला भाजपने बेईमानी केली आहे. महायुतीत जागा वाटप सुरु झाल्यानंतर एकमेकांच्या छातीवर बसतील. आगोदर आम्ही बोलत होतो आणि गडकरी बोलत आहेत.
नाशिकमधील तलाठी पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी गणेश गुसिंगे हा मास्टरमाईंड आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या म्हाडा भरती आणि २०२१ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्याच्याविरोधात खेरवाडी, पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात अगोदर गुन्हा दाखल आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात परतला पाऊस, पहाटेपासून पावसाला चांगलीचं सुरुवात झाली आहे. सुमारे 20 दिवसानंतर धान पट्ट्यात पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
येवला तालुक्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पी आजाराने डोकं वर काढल असून मोठ्या प्रमाणात जनावरांना आजारचा प्रादुर्भाव होत आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आदिवासी विकास प्रकल्प विभागातील लेखाधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली. वसतिगृहाचे थकीत घरभाडे पडताळणी करून मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचं सरकारला काहीचं पडलेलं नाही. सरकारनं राज्यातील परिस्थिती अत्यंत घाण करुन ठेवली आहे. बागलकोट येथील महाराजांचा पुतळा अनधिकृत होता. सत्तेच्या हव्यासापोटी राज्याची सरकारनं पत घालवली. राज्यातील खुर्ची सप्टेंबर महिन्यात बदलेलं असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यात जनावरांचा आठवडे बाजार आणि बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आली आहे. जनावरांना लम्पीची बाधा होत असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआयला तपासात लक्ष घालण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. अतिरीक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांच्यामार्फत ही मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री या नात्याने राजकीय पक्ष फोडणे बंद करुन परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. तलाठी भरतीचा पेपर फुटला यावर त्यांनी राज्य सरकावर टीका केली.
पुण्यात कोथरूड मध्ये व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाला व्यक्तीला ८ लाख ४५ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तामाब्रता रॉय आणि सामाब्रता रॉय या दोघाxच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
‘इंटरलॉकिंग’च्या कामामुळे मध्ये रेल्वेच्या १२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २० ते ३० ऑगस्ट दरम्यान या रेल्वे रद्द केल्या आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 50 हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. यंदा गोविंदा स्टेडियममध्ये होणार असून प्रो गोविंदा असल्यास नाव देण्यात येणार आहे. दहीहंडी समन्वय समिती महाराष्ट्र या संघटनेने राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटवल्याच प्रकरणी आज भाजप, हिंदू जागरण वेदिकासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून बागलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. बागलकोटच्या बसवेश्वर चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येणार आहेत. यावेळी निषेध सभा घेत प्रशासनाला निवेदन दिलं जाणार आहे. भाजपचे माजी मंत्री गोविंद कारजोळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.
राज्यभरात पाऊस पुन्हा परतणार आहे. आजपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात देखील हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 3 दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, परभणी नांदेडमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
दिल्ली-नोएडा परिसरात आज पहाटे पहाटेच जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिल्लीकरांना उकाड्यातून मोठा दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे.
ईश्वरलाल ज्वेलर्सवरील ईडीची छापेमारी अखेर 40 तासानंतर संपली आहे. जळगावातील ही आजवरची सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. या छापेमारीत ईडीने रोख रक्कम, सोने आणि काही कागदपत्रे जप्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं.