कोल्हापूरः राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन राज्यात सत्तांतर घडवून आणले. चाळीसपेक्षा अधिक आमदारांना फोडून शिंदे गट स्थापन करुन एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सत्तानाट्याचा परिणाम राज्यातील आगामी निवडणुकांवर होणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी कोल्हापूर महानगरपालिकेत (Kolhapur municipal corporation election 2022) या सत्तानाट्याचा काय परिणाम होणार हे आता निवडणुकीनंतरस्पष्ट होणार आहे. कोल्हापूरातील माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rebel Former MLA Rajesh Kshirsagar) आणि खासदार संजय मंडलिक यांनी बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाले असल्यानेही त्याचा परिणाम नक्कीच मनपा निवडणुकीवर दिसणार असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसकडून सुरेखा प्रेमचंद्र शहा आणि ताराराणी आघाडीकडून वर्षा दत्तात्रय कुंभार यांनी बाजी मारली होती. त्यामुळे आता बदलेल्या आरक्षणानुसारही प्रभाग क्र. 20 ची गणितं अवलंबून असणार आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 20 मध्ये आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण अशा प्रकारचे आरक्षण येथील जाहीर झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्याचा प्रचंड मोठा परिणाम या प्रभागावर दिसून येणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 या क्षेत्रात रेसकोर्स नाका, क्रीडा संकुल, मंगेशकर नगर, बेलबाग, जयप्रभा स्टुडिओ, विश्वपंढरी, वारे वसाहत, संभाजीनगर, गजानन महाराज नगर, हॉकी स्टेडियम, पद्मावती मंदिर, व गार्डन भक्ती, पूजा नगर, मंडलिक वसाहत, महालक्ष्मी नगर, शाहू दयानंद हायस्कूल, जुनी एनसीसी ग्राउंड, पोलीस कॉलनी, त्यागी नगर, सरनी हॉस्पिटल, संभाजीनगर, तर उत्तर परिसरात शिंगोशी मार्केटचे पूर्वेकडील हनुमान मंदिर ते देवणे गल्लीने पूर्वेकडे मुख्य रस्त्यापर्यंत तिथून पूर्वेकडे पेटीएम तालीमंडळापर्यंत ते गोखले कॉलेज चौक रस्ता देवतात्मा पार्क घोड्यावरील पुलापर्यंत येते.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
पूर्व भागात जयंती नाला हुतात्मा पार्क समोरील पुलापासून जयंती नाल्याने दक्षिणेस रेणुका मंदिर चौक घोड्यावरील फुलापर्यंत योगेश जीन ते दक्षिणेस सुभाष नगर रोड ने केले कॉलनी चौकापर्यंत तिथून सीसी नंबर 28 32 ते पश्चिमेकडे कृष्ण कृष्ण कज्ञ अंतर्गत रस्त्याने कालिकापुरम अपार्टमेंट दक्षिणेकडील ओपन स्पेस हद्दीने नाल्यापर्यंत तिथून दक्षिणेकडे जयंती नाल्याने हॉकी स्टेडियम पूर्वेकडील 30 मीटर रिंग रोडवरील नाला फुलापर्यंत येते दक्षिण भागात हॉकी स्टेडियम पूर्वेकडील जयंती नालावरील पूल ते पश्चिमेस आदर्श वसाहत चौकापर्यंत तिथून उत्तरेस रोडने राजाराम रेसिडेन्सीचे उत्तरेकडील अग्रवाल हाऊसिंग प्रकल्पाचे उत्तरेकडील नाल्यापर्यंत तिथून पश्चिमेस ताराराणी गार्डन चौकापर्यंत उत्तरेस ओम गणेश कॉलनी मित्र मंडळ चौकापर्यंत ते पश्चिमेस रेस कोर्स नाका चौक टिंबर मार्केट कमानी समोर पर्यंत येते.
पश्चिम बाजूला टिंबर मार्केट कमानी समोरील रेस्क्यूस नाका ते उत्तरेस कळंबा मेन रोड शाहू बँक चौकापर्यंत ते पूर्वेस राम गल्ली तिथून उत्तरेस राम गल्लीने तुर्भ चौक पर्यंत ते पूर्वेस मंडली गल्लीने चौंडेश्वरी हॉल समोरील रस्त्याने कोष्टी गल्ली महादेव मंदिर ते शिंगोशी मार्केटचे पूर्वेकडील हनुमान मंदिरापर्यंत या प्रभाग पसरलेला आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |