‘त्या’ आमदारांबाबत मोठं भाकीत, नवा पर्याय कोणता? शरद पवार यांचं मोठं विधान

| Updated on: Aug 14, 2023 | 8:41 PM

शरद पवारांना समर्थन देण्यासाठी अनेक कार्यकर्ते जमले होते. गोविंद बागेत कार्यकर्त्यांची शरद पवारांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवार यांनी अनेक पदाधिकाऱ्यांशी स्वतः संवाद साधला.

त्या आमदारांबाबत मोठं भाकीत, नवा पर्याय कोणता? शरद पवार यांचं मोठं विधान
SHARAD PAWAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

बारामती । १४ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची पुण्यात अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी अजित माझा पुतण्या आहे. मी पवार कुटुंबातील वडिलधारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला भेटायला ते आले होते असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे.

शरद पवार यांनी आज बारामती येथील गोविंद बाग निवासस्थानी आले असता त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. शरद पवारांना समर्थन देण्यासाठी अनेक कार्यकर्ते जमले होते. गोविंद बागेत कार्यकर्त्यांची शरद पवारांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवार यांनी अनेक पदाधिकाऱ्यांशी स्वतः संवाद साधला. गेलेले आमदार परत येऊ शकतात असे भाकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधन करताना वर्तविले.

हे सुद्धा वाचा

सोलापूर जिल्ह्यात लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. काल लोक गाडी अडवत होते. त्यांना विचारले, काय मागणे आहे तर त्यांनी सांगितले काही मागणे नाही. आम्ही तुमच्या सोबत आहे हे सांगायचे होते, काल गणपत देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावर झाले. तिथे उपमुख्यमंत्री होते पण जेव्हा तिथे माझं नाव घेतले त्यावेळी लोकांचा उत्साह दिसत होता, असे पवार म्हणाले.

माझ्या बुद्धीला पटत नाही

आपण विचारांशी पक्के आहोत. सर्व सामान्य माणूस सगळं बघत असतो. त्याचे डोळे उघडे असतात. जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा तो बरोबर बटन दाबतो त्यामुळे लोकशाही टिकली आहे. आपण विचार कधी सोडायचा नसतो. महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगितले की यांना मत द्या. लोकांनी त्यांना निवडून दिले. पण, आता ज्यांच्या विरोधात आपण लढलो त्यांच्याशी जुळवून घ्या असे मी म्हणू शकत नाही. ते माझ्या बुद्धीला पटत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आहे ते चित्र बदलू शकतो

पवार पुढे म्हणाले, लोक मला विचारतात की या सगळ्या परिस्थितीला पर्याय काय. तर मी सांगतो शरद पवार… आणि लोकांना ते आवडलं. लोक आपल्यासोबत आहेत. यश, अपयश येऊ द्या. पण, सामान्य माणूस तुमच्यासोबत राहिला पाहिजे एवढंच. आहे ते चित्र बदलू शकतो. आनंद एकच आहे की तुम्ही सोबत आहात.

आपला रस्ता बदलायचा नाही

मी अनेक ठिकाणी जात आहे. येवल्यात भली मोठी सभा झाली. लोक सुप्रियाच्या संसदेतील भाषणाचे कौतुक करतात. महिला सांगतात की सुप्रिया सुळे समस्त महिलांचा संसदेत आवाज आहेत. तिनेही आपला विचार सोडला नाही. आपल्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. आज ना उद्या त्यांच्या स्थिती लक्षात आल्यानंतर बदल होऊ शकतात. त्यांच्यात बदल होवो अगर ना होवो आपला रस्ता आपल्याला बदलायचा नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.