औरंगाबाद : आज औरंगाबादेत (Aurangabad) राज ठाकरेंची (Raj Thackeray) तुफानी सभा पार पडलीय. यात त्यांनी आज खासकरून शरद पवार (Sharad Pawar) आणि मशीदीवरील भोंग्यांना पुन्हा टार्गेट केलं आहे. पवारांवर त्यांनी पुन्हा जातीय राजकारण पसरवल्याचा आरोप केला तर भोंग्यांना पुन्हा इशारा दिला. आज तारीख 1, उद्या तारीख 2. 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा पुन्हा राज ठाकरेंनी दिला. तसेच हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागलीपाहिजे. विनंती करून ऐकत नसेल तर पर्याय नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही. असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच आम्हाला सभा घेतना हा सायलन्स झोन आहे. शाळा आहे. रात्री कुठे शाळा असेत. यांना कुठेही. रस्त्यावर उतरून नमाज पढताता. कुणी अधिकार दिला, असा सवालही त्यांनी केला आहे.
पण राज ठाकरे फक्त हे बोलले आणि सभेच्या वेळीच अजून सुरू झाली. त्याचाही समाचार राज ठाकरेंनी घेतला आहे. सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत आता बोळा कोंबावा. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती परत सांगतोय. एकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे,. पहिले मशिद नंतर मंदिर. अभी नही तो कभी नाही. हव तर पोलिसांची परवानगी घ्या लाऊडस्पीकरची घ्या. त्यांना द्यावीच लागते., परवानगी घेऊन जोरात कराल. सामाजिक दृ,ष्टया प्रलंबित प्रश्न मार्गी लावा. हातभार लावाल,. ही विनंती करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
लाऊडस्पीकर अनेकांनी विषय मांडला. मी फक्त त्याला पर्याय दिला. मशिदीवर लाऊडस्पीकर लावणार असाल तर आम्ही मशिदीबाहेर हनुमान चालिसा पढवू. मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. माझी इच्छाही नाही. मुस्लिम समाजानेही ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. नाशिकला एक पत्रकार आले. मुस्लिम समाजातील होते. म्हमाले मी मुसलमान आहे. आम्हाला भोंग्याचा त्रास होतो. माझं लहान मुल लाऊडस्पीकरमुळे झोपेना. ते आजारी पडायला लागलं. झोप लागली तर अजान सुरू होते. मी मौलवींना सांगितलं मुलाला त्रास होतो. तुम्ही मशिदीतच्या आत करा. त्यानंतर त्याने कमी केलं. असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
तसेच लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. तो धार्मिक विषय नाही. त्याला धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्माने द्यावं लागेल. एवढं लक्षात टेवााव. इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायाला लावू नका. महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची नाही. उत्तर प्रदेसात उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही. सर्व लाऊडस्पीकर अनाधिकृत आहे. पोलिसांना विचारल्याशवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. कोर्टाने सांगितलं. किती मशिदींकडे परवानगी आहे. कुणाकडेच नाही. मला कोणी तरी सांगितलं. संभाजीनगरात ६०० मशिदी आगहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे, अख्खे देसभर आहे.