Ajit Pawar | ‘अपत्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले देवाची कसली नवऱ्याची कृपा’

| Updated on: Aug 17, 2023 | 2:07 PM

Ajit Pawar | "काळानुसार बदल करायला लागतात. आयकर माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अमित शाह यांनी घेतला" असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शिर्डी येथे ते शासन आपल्यादारी कार्यक्रमासाठी आले होते.

Ajit Pawar | अपत्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले देवाची कसली नवऱ्याची कृपा
ajit pawar
Follow us on

शिर्डी : “ज्यांना लाभ मिळाला त्या नगरकरांचे स्वागत. मागे हा कार्यक्रम ठरला होता, पण काही कारणास्तव झाला नाही. पण आज दिमाखदार पद्धतीने कार्यक्रम होत आहे. सामान्य नागरिकांना दुर्देवाने लाभ मिळत नाही. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू केला” असं उपमुख्यमंत्री असं अजित पवार म्हणाले. “आज शिर्डीमध्ये हा कार्यक्रम झाला. अधिकारी लाभार्थ्यांना हुडकवून लाभ देतात. महापुरुष आणि महामानव यांचा आदर्श ठेऊन आम्ही काम करतोय. शाहू-फुले आंबेडकर यांचा विचार बाजूला ठेऊन आम्ही काम करत नाही. राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मभूमीत हा कार्यक्रम होतोय याचा आनंद आहे असं अजित पवार म्हणाले.

“सामान्य नागरिकांचे सरकार हे फक्त सांगण्यासाठी नाही, तर कृतीतून आम्ही दाखवत आहोत. श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देणारे साई बाबा यांच्या नगरीत हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रम झाल्यावर आम्ही सगळे जण दर्शनासाठी जाणार आहोत” असं अजित पवार म्हणाले.

“जिल्ह्यातील काही लोक अतिजागृक असतात. जिल्ह्यात आल्यावर आजोळ आल्यासारखं वाटतं. तुम्ही सगळे माझे आजोळ कर. घेतलेले निर्णय सगळे राज्याच्या हितासाठी घेतले. सगळ्यांना सोबत घेऊन काम करत आहोत. अजून पाऊस पडलेला नाही, ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाळा पुढे गेला असे वाटतं” असं अजित पवार म्हणाले.

अमित शाह यांच्या कुठल्या क्रांतीकारी निर्णयाबद्दल अजित पवार काय म्हणाले?

“गेल्या वर्षी 100 टक्के धरणं भरली होती. काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडला. बळीराजा मागे राहू नये, यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परकीय चलन वाचविण्यासाठी इथेनॉल तयार करायला सांगितले. पेट्रोल पंप चालवायला परवानगी देतो असं सांगितलं. काळानुसार बदल करायला लागतात. आयकर माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अमित शाह यांनी घेतला” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शिर्डी येथे ते शासन आपल्यादारी कार्यक्रमासाठी आले होते. “साखर उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अमित शाह यांनी निर्णय घेतला. आयकरच्या जाचातून सुटका केलीय” असं अजित पवार म्हणाले.

लोक म्हणायला लागले, आमच्या रानातून रस्ता नेता का ?

“नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिर्डीला नाईट लँडिंगची सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाविक येणार आणि लोकांना रोजगार मिळणार. आम्ही पण समृद्धीला सुरुवातीला लोकांसोबत विरोध केला. पण लोकांनी जमीन दिली. पैसे मिळाले त्यांनतर लोक म्हणायला लागले, आमच्या रानातून रस्ता नेता का ?” असं अजित पवार म्हणाले.

‘एक किंवा दोन अपत्यांवर थांबा’

“शासन जे करतं, ते चांगल्यासाठी करतं. वंदे भारतने मी देखील प्रवास केला. लाल किल्ल्यावरून 10 वर्षाचा हिशोब तिरंग्याच्या साक्षीने नरेंद्र मोदी देत होते. केंद्राकडून 3 लाख कोटी रुपये स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी दिला जातो” असं अजित पवार म्हणाले. “आपण एक किंवा दोन अपत्यांवर थांबा. चायनाला मागे टाकलं. आपण उगाच देवाची कृपा करू नका. देवाची कसली नवऱ्याची कृपा. मुख्यमंत्री 20 तारखेला जपानला चालले. मजा करायला नाही, गुंतवणूक आणतील” असं अजित पवार म्हणाले.