नवी दिल्ली : ईद हा सण मुस्लिम बांधवांसाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तसेच ईदनिमित्त लोक कुठेना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करतातच. पण फिरायला जायचं कुठे याबाबत अनेकजण कन्फ्यूज असतात. राजधानी दिल्लीमधील काही अशी बेस्ट ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता.
ईदनिमित्त तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तुम्ही दिल्लीतील काही अशी बेस्ट ठिकाणे आहेत तिथे नक्की जा. याच ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही या ठिकाणांवर फिरायला जाऊन तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवू शकता.
कुतुबमिनार – ईदनिमित्त तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तुम्ही कुतुबमिनारला भेट देण्यासाठी जाऊ शकता. हे ठिकाण फिरायला जाण्यासाठी बेस्ट आहे. कुतुबमिनारची भव्य वास्तू पाहून तुम्ही नक्की मंत्रमुग्ध व्हाल. तसेच तुम्हाला हे ठिकाण खूप आवडेल.
हुमायूनचा मकबरा – हुमायूनचा मकबरा हे ठिकाण सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत दर्जेदार वेळ घालवायचा असेल तर तुम्ही हुमायूनच्या मकबऱ्याला भेट देऊ शकता.
लाल किल्ला – दिल्लीतील लाल किल्ल्याबद्दल प्रत्येकाला माहिती असेलच. तर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर दिल्लीतील लाल किल्ल्याला भेट देऊ शकता. तुम्हाला हे ठिकाण खूप आवडेल. लाल किल्ला हा जुन्या दिल्लीत आहे. तसेच या किल्ल्याची अनोखी वास्तुकला पाहून तुम्ही नक्कीच त्याच्या प्रेमात पडाल.
इंडिया गेट – तुम्ही इंडिया गेटवर फिरायला जाऊ शकता. येथील उद्यानात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत किंवा प्रियजनांसोबत काही क्षण शांततेत घालवता येतील. हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. तसेच जर तुम्हाला रस्त्यावरचे पदार्थ चाखायला आवडत असतील तर तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल.