महत्वाची बातमी : मोमोज खाल्ल्याने एकाचा मृत्यू, AIIMS कडून खाद्यप्रेमींना सावधानतेचा इशारा

| Updated on: Jun 15, 2022 | 3:24 PM

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने एक महत्वाचा सल्ला दिली आहे. मोमोज खाणाऱ्यांना एम्सने महत्वाची सूचना दिली आहे.

महत्वाची बातमी : मोमोज खाल्ल्याने एकाचा मृत्यू, AIIMS कडून खाद्यप्रेमींना सावधानतेचा इशारा
Follow us on

मुंबई : खाद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी… ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने (AIIMS) एक महत्वाचा सल्ला दिली आहे. मोमोज (Momos) खाणाऱ्यांना एम्सने महत्वाची सूचना दिली आहे. मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर एम्सकडून महत्वाचा सल्ला दिला गेला आहे. मोमोज गुळगुळीत असतात. त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर गुदमरू शकतो. मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे या मोमोज खाताना विशेष काळजी घ्या, असं एम्सच्या अधिसूचनेत म्हणण्यात आलं आहे.

मोमोज खाल्ल्यानंतर एकाचा मृत्यू

मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. त्याच्या श्वसनमार्गामध्ये मोमो अडकलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मोमोजमुळे त्याचा गुदमरला आणि या व्यक्तीचा मृत्यू झाला.

मोमोज् प्रेमींना सूचना

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने एक महत्वाचा सल्ला दिली आहे. मोमोज खाणाऱ्यांना एम्सने महत्वाची सूचना दिली आहे. मोमोज गुळगुळीत असतात. त्यामुळे जर कुणी मोमोज नीट चावले आणि गिळले नाहीत तर गुदमरू शकतो. मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे या मोमोज खाताना विशेष काळजी घ्या, असं एम्सच्या अधिसूचनेत म्हणण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

मोमोज हे स्ट्रीटफूड आहे. त्यामुळे हे बनवताना स्वच्छतेची तितकीशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळेही अनेकांना त्रास जाणवतो. मोमोज मैद्यापासून तयार केलं जातं. त्यामुळे स्वादुपिंडाशी संबंधित आजार उद्भवतात. त्याचा इन्सुलिन निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो. शिवाय मज्जातंतूचे विकार, घाम येणं, वारंवार छातीत दुखणं, मळमळ होणं आणि हृदयाचे ठोके वाढणं यासारखे आरोग्य धोक्यात संभवतात.

सर्वांनाच मोमोज खायला आवडतात. स्वस्तात मस्त आणि टेस्टी असल्याने मोमोज खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. पण हेच मोमोज खाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एम्सच्या वतीने आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला आहे.