Skin Problems : मान्सूनमध्ये खाजेचा सतत होत असेल तर त्रास, तर या गोष्टी करणे टाळाच, अन्यथा…

| Updated on: Aug 23, 2023 | 1:29 PM

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. ॲलर्जी आणि इन्फेक्शनही वाढते. अनेक कारणांमुळे खाज येण्याचा त्रास होतो.

Skin Problems :  मान्सूनमध्ये खाजेचा सतत होत असेल तर त्रास, तर या गोष्टी करणे टाळाच, अन्यथा...
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित समस्याही बऱ्याच लोकांना होतात. खाज सुटणे (itching on skin) , पुरळ उठणे, रॅशेस येणे यामुळे अनेकांना त्रास होतो. शरीराच्या तापमानात बदल होणे, हवेतील आर्द्रता वाढणे, जास्त घाम येणे, स्वच्छतेचा अभाव आणि ॲलर्जी येणे किंवा एखाद्या केमिकलच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या समस्या (Skin Problems in Monsoon) उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. जाणून घेऊया…

साबण-केमिकलचा वापर

त्वचेशी निगडीत समस्यांची सुरूवात बर्‍याचदा खाज सुटणे आणि जळजळीपासून सुरू होते. जेव्हाही असा त्रास सुरू होईल, तेव्हा सर्वप्रथम साबण, परफ्यूम, दुर्गंधीनाशक आणि बॉडी वॉश या केमिकल युक्त उत्पादनांचा वापर पूर्णपणे बंद करा. कारण केमिकलमुळे ॲलर्जी होऊ शकते.

दागिन्यांचा वापर

अनेक वेळा गळ्यातील चेन, नेकलेस किंवा हाताताली बांगड्या ज्या धातूपासून बनवलेल्या असतात, ते घामाच्या संपर्कात आल्यावर त्वचेशी निगडीत समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत जेव्हा असा त्रास होतो तेव्हा कृत्रिम दागिन्यांचा वापर करू नये.

योग्य कपडे घालावेत

त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर फक्त सुती कपडे घाला. त्यामुळे घाम सुकतो आणि हवा त्वचेपर्यंत पोहोचू शकते. सिंथेटिक किंवा जरीचे, लेस असलेले कपडे घालणे टाळावे. नेहमी सैल आणि योग्य कपडे घालावेत.

कपडे व सामान वेगळं ठेवावे

त्वचेशी संबंधित समस्यांवर उपचार घेत असाल तर तुमचे कपडे आणि सामान नेहमी वेगळे ठेवा. टॉवेल-नॅपकिन, अंतर्वस्त्र यांसारख्या गोष्टी पूर्णपणे स्वच्छ धुवा.

सारखं खाजवू नका

त्वचेला खाज सुटत असेल तर तेव्हा जास्त वेळ खाजवणे टाळावे. त्यामुळे ॲलर्जी आणि इन्फेक्शन वाढणार नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)