मुंबई : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आयपीएल सुरू असून मैदानामधील काही व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर दिसत आहे. गेली अनेक वर्षे वॉटर बॉय म्हणून मैदानात दिसणारा अर्जुन आता मुंबई इंडिअन्स संघाकडून खेळतो. अर्जुनने मैदानामध्ये काहीसुद्धा केलं तर त्याची बातमी झालेली दिसते. अशातच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन जे काही करत आहे त्यावरून तो ट्रोल झालेला पाहायला मिळत आहे.
अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या पर्वातील 22 व्या सामन्यामध्ये पदार्पण केलं. वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध त्याने पहिला सामना खेळला होता. या सामन्यात त्याला विकेट मिळाली नव्हती पण तेंडुलकर कुटुंबासाठी हा क्षण खास होता. गेली अनेक वर्षे अर्जुन मैदानात दिसत होता पण अंतिम 11 मध्ये त्याला स्थान मिळत नव्हतं. मुंबई टीम मॅनेजमेंटने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला आणि अर्जुनच्या प्रयत्नांना यश आलं.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर साऱ्या जगाला माहित आहे. सचिन तेंडुलकरशिवाय क्रिकेट खेळ पूर्ण होऊ शकत नाही. रिटायर झालेला सचिन मैदानात आला तरी क्रीडा चाहत्यांचा उत्साह आणि स्टेडिअममधून सचिन…सचिन असा आवाज येऊ लागतो. आता तेंडुलकर मैदानात खेळताना दिसत आहे तो सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आहे. त्याच्याकडूनही चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर हा अर्जुनचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. अर्जुनने मैदानात ती कृती करताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलेलं दिसत आहे.