नवी दिल्ली : जंगलांच्या आगीमुळे सर्वत्र उष्णतेने कहर केला असून यात घुसमटलेली निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर आहे, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) दिला आहे. मागील 46 वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या उष्णतेच्या दाहकतेमध्ये जगाची होरपळ सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेला जंगलातील वणवा हे एक प्रमुख कारण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांमध्ये जंगले जळत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचे (Global Warming) संपूर्ण जगाला मोठ्या चिंतेत टाकले आहे. युरोप, अमेरिका, चीनसारखे (China) अनेक देश भीषण गरमीच्या तडाख्यात सापडले असून फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांतील जंगलांच्या आगीने उष्णतेची तीव्रता भयंकर वाढवली आहे. ब्रिटनचे तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे देशातील पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.
स्पेनमध्ये 36 ठिकाणी वणवे भडकले आहेत. यामध्ये 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा भस्मसात झाली आहे. परिणामी दक्षिण-पश्चिम स्पेनमध्ये तापमानाने 44 अंश सेल्सिअसच्या पुढे उसळी घेतली आहे. अनेक लोक उष्माघाताचे बळी ठरत आहेत.
मागील 46 वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या उष्णतेच्या दाहकतेमध्ये जगाची होरपळ सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेला जंगलातील वणवा हे एक प्रमुख कारण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांमध्ये जंगले जळत आहेत.
महापूर, भीषण दुष्काळ, तीव्र चक्रीवादळे आणि जंगलांतील आगीचा निम्म्यहून अधिक लोकसंख्येला धोका आहे. कुठलाही देश या आव्हानाचा सामना करू शकत नाही. असे असतानाही आपण जीवाश्म इंधनाची साथ सोडायला तयार नाही. याला त्रासलेली निम्म्याहून अधिक लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर आहे. सामूहिक कृती की सामूहिक आत्महत्या ? हे ठरवणे आपल्याच हाती आहे.
अँटोनिओ गुटेरेस, महासचिव, संयुक्त राष्ट्रसंघ
फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांतील जंगलांच्या आगीने उष्णतेची तीव्रता भयंकर वाढवली आहे. ब्रिटनचे तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे देशातील पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.