PM Modi in Hiroshima : हिरोशिमामध्ये ‘या’ दोन व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का भेटले?, काय आहे कारण?

| Updated on: May 20, 2023 | 3:33 PM

PM Modi in Hiroshima : पंतप्रधान नरेंद्र मोदी जापान दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने अणूबॉम्ब टाकलेल्या हिरोशिमा शहरामध्ये मोदी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथे एका डॉक्टरची भेट घेतली.

PM Modi in Hiroshima : हिरोशिमामध्ये या दोन व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का भेटले?, काय आहे कारण?
PM Narendra Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिरोशिमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर सम्मेलनात सहभागी होण्यासाठी जापानमध्ये आहेत. सम्मेलनाआधी पंतप्रधान मोदींच्या वेगवेगळ्या बैठका सुरु आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जापानी नागरिक डॉक्टर तोमियो मिजोकामी यांना भेटले. डॉक्टर तोमियो पेशाने लेखक आहेत. ते हिंदी आणि पंजाबी भाषेचे चांगले जाणकार आहेत. भारत आणि जापानमधील घनिष्ठ संबंधांच श्रेय डॉक्टर तोमियो मिजोकामी यांना दिलं जातं. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांचा चांगला अभ्यास आहे.

G7 शिखर सम्मेलन जापानच्या हिरोशिमा शहरात आयोजित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून डॉक्टर तोमियो यांनी जापानमध्ये विश्व हिंदी संम्मेलन आयोजित करण्याची विनंती केली.


ते डॉक्टर कोण?

जापानच्या कोबे शहरात तोमियो यांचा जन्म झाला. त्यावेळी तिथे भारतीय लोक मोठ्या संख्येने वास्तव्याला होते. भारतीय लोक हिंदी भाषा बोलायचे. त्याचाच तोमियो यांच्यावर प्रभाव पडला. हिंदी भाषा शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे.


मिज़ोकामी नेहरुंबद्दल काय म्हणाले?

नेहरुंपासून आपण खूप प्रभावित होतो, असं डॉक्टर तोमियो मिजोकामी यांनी सांगितलं. आपल्या बालपणाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु यांचा एक जागतिक प्रभाव होता. आमच्या सारख्या मुलांसाठी नेहरु एक प्रेरणास्थान होते. त्यांना शांतता आणि स्थिरता हवी होती”

डॉक्टर तोमियो मिजोकामी कुठल्या भारतीय पुरस्काराने सन्मानित?

ओसाका विश्वविद्यालयातील डॉक्टर तोमियो मिजोकामी यांना साहित्य आणि शिक्षा क्षेत्रातील योगदानासाठी 2018 साली प्रतिष्ठेच्या ‘पद्म श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हिंदी भाषा आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याआधी 2001 साली डॉक्टर तोमियो मिजोकामी यांना उत्तर प्रदेश सरकारने ‘हिंदी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

किती भाषांचा अभ्यास?

1941 मध्ये जन्मलेल्या डॉक्टर तोमियो मिजोकामी यांनी भारत आणि जापानमध्ये हिंदी भाषेच्या अभ्यासासाठी बराचवेळ घालवला. 81 वर्षीय मिजोकामी यांनी ग्रॅज्युएशननंतर 1965 ते 1968 दरम्यान अलाहाबाद येथे हिंदी विषय शिकवला. या दरम्यान त्यांनी पंजाब आणि बंगाली भाषेचा सुद्धा अभ्यास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा शहरात जापानी चित्रकार हिरोको ताकायामा यांची सुद्धा भेट घेतली. त्या 42 वर्षांपूर्वी भारतात आल्या होत्या.