पृथ्वीवरील सर्वात आवडतं काय ? अंतराळातून व्हिडीओ कॉलवरुन वडीलांनी दिले हृदयस्पर्शी उत्तर

| Updated on: Aug 18, 2023 | 5:46 PM

अंतराळ मोहीमेवर गेलेले अंतराळवीर सुल्तान अल अंतराळ स्थानकातून आपल्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारतात. तेव्हा मुलगा अब्दुल्ला वडीलांना आपला परिचय देत सलाम करतो.

पृथ्वीवरील सर्वात आवडतं काय ? अंतराळातून व्हिडीओ कॉलवरुन वडीलांनी दिले हृदयस्पर्शी उत्तर
space
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : एकीकडे चंद्रयान मोहीम सुरु आहे, तर दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीचे अंतराळवीर सुल्तान अल नेयादी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसद्वारे त्याच्या लहानग्या मुलाशी मारलेल्या गप्पांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांचा मुलगा अब्दुल्ला सुल्तान अल नियादी स्वत:चा परिचय करुन देत पित्याला सलाम करतो आणि एक प्रेमळ प्रश्न विचारतो. संयुक्त अरब अमिरातीचे अंतराळवीर नेयादी सहा महिन्याच्या अंतराळ मोहीमेवर अंतराळ स्थानकात गेले आहेत.

अंतराळ मोहीमेवर गेलेले अंतराळवीर सुल्तान अल अंतराळ स्थानकातून आपल्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारतात. तेव्हा मुलगा अब्दुल्ला वडीलांना आपला परिचय देत सलाम करतो. आणि वडीलांना विचारतो, तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात काय आवडते ? तेव्हा अल नेयादी हसत उत्तर देतात, पृथ्वीवरील सर्वात जास्त मला तूच आवडतो. त्यानंतर ते पुढे म्हणाले की पण अंतराळातील मला काय आवडते असे विचारशील तर, तुला माहीतच आहे की येथे आम्ही मायक्रोग्रेव्हीटी वातावरणात आहे. आम्ही येथे अनेक मजेशीर गोष्टी करु शकतो. ज्या तुला खूप आवडतील. आम्ही सर्वकाही करु शकतो. जसे एका ठीकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जाऊ शकतो.

अ कॉल फ्रॉम स्पेस

या मार्मिक गप्पाचा एक व्हिडीओ मोहम्मद बिन राशिद अंतराळ केंद्राने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की अंतराळवीर सुल्तान अल नेयादी यांच्या मुलाने अ कॉल फ्रॉम स्पेस- उम्म अल क्वॅन एडीशन कार्यक्रमा दरम्यान त्यांना प्रश्न विचारला की पृथ्वीवर त्यांना सर्वात जास्त काय आवडते ?

डॉ. अल नेयादी यांचे वडील आणि त्यांच्या सहा मुलांपैकी दोन जणांनी अ कॉल फ्रॉम स्पेस कार्यक्रमात सहभाग घेतला. ज्यात अंतराळ स्थानकातून राज्य आणि अंतरिक्ष प्रमुखांशी लाईव्ह गप्पा मारल्या.

हाच तो अंतराळातून केलेला व्हिडीओ कॉल-

1 सप्टेंबरला संपणार मिशन

42 वर्षीय अंतराळवीर आणि चार सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सहा महिन्यांची मोहीमे पूर्ण करुन 1 सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परत येण्याचा प्रवास सुरु करतील. या वर्षी एप्रिलमध्ये नेयादी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाहेर येऊन आपला स्पेसवॉक पूर्ण करण्याच्या मोहीम 69 चे पहिले अरब व्यक्ती बनले आहेत.

सोशल मिडीयावर अनेकांनी यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की मुलांना आपल्या वडीलांचा अभिमान वाटला पाहीजे. अन्य एकाने म्हटले की, ‘वाह किती प्रेमळ गप्पा आहेत’, सुंदर..या यशाबद्दल अमिराती बांधवाचे अभिनंदन असे अन्य एका युजरने सांगितले.