न्यूजर्सी | 21 ऑगस्ट 2023 : बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर एक महिला डिप्रेशनमध्ये गेली. ती इतकी टेन्शनमध्ये होती की कुणाशीही पुन्हा रिलेशनशीप करण्याची तिची इच्छा नव्हती. याच काळात वर्तमानपत्रात तिने एका व्यक्तीचा फोटो पाहिला. हा तरुण तिच्या परिचयाचा नव्हता. त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडलं. त्यानंतर ती सोशल मीडियावरून त्याला वेड्यासारखं शोधत होती. अनेकांना विचारून पाहिलं. गुगलवर सर्च करून पाहिलं. पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. पण तिने हार मानली नाही. ती शोधतच गेली अन् एक दिवस अचानक…
एविगेल अॅडम असं या 42 वर्षीय महिलेचं नावस आहे. टॉम स्जाकी सारखा सुंदर आणि हँडसम हंक उभ्या आयुष्यात पाहिला नाही, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर तिने टॉमसोबतच्या लव्ह स्टोरीचा उलगडा केला. एकदा चहा पीत असताना माझी नजर एका वृत्तपत्रावर गेली. त्यात टॉमशी संबंधित लेख होता. इस्रायलमध्ये टॉमने नुकतीच एक रीसायकलिंग कंपनी सुरू केली आहे. त्याबाबतचा हा लेख होता. लेख वाचताना माझी नजर टॉमच्या फोटोवर गेली. त्याच्या लूक्सवर मी प्रचंड फिदा झाले. ते इतके की आठवडाभर मी वारंवार त्याचा फोटोच पाहत होते, असं एविगेल म्हणाली.
त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत टॉमचा शोध घेण्यास तिने सुरुवात केली. तिने वेड्यासारखे सर्व सोशल मीडिया धुंडाळले. त्यानंतर फेसबुकवर तिने टॉमला शोधण्यास सुरुवात केली. शोधण्याचा हा प्रवास एक दिवस थांबला. मला टॉम भेटला. त्यानंतर मी त्याला मेसेज केला आणि त्याच्यासोबत कॉफी पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आमची डेटिंग सुरू झाली. टॉमही माझ्यावर फिदा झाला, असं तिने सांगितलं.
त्यानंतर टॉम मला एका कॉन्फरन्ससाठी हॉलंडला घेऊन गेला. त्यानंतर आम्ही अमेरिकेत अनेक ठिकाणी फिरलो. दोन वर्षानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असं ती म्हणते. आज एडम आणि टॉमला चार मुले आहेत. एडम न्यूजर्सी येथील रहिवाशी आहे. ती ज्वेलरी डिझायनर आहे. टॉमसारखा जीवन साथी मिळाला हे माझं भाग्य आहे, असं ती म्हणते. तर मला जी जीवनसाथी हवी होती, ते सर्व गुण एविलमध्ये आहेत, असं टॉमचं म्हणणं आहे.